पुण्यात पावसाळ्यात एका दिवसाची ट्रिप काढायची असेल, तर जवळील ठिकाणे उत्तम आहेत. पावसात निसर्गसौंदर्य खुलते आणि सह्याद्री डोंगररांगा हिरव्या रंगाने नटतात.
पुण्यापासून 64 किमी अंतरावर लोणावळा आहे. भुशी धरण, लोणावळा तलाव आणि कार्ला लेणी पाहण्यासारखी आहेत. धबधबे आणि हिरवळ येथे आकर्षण ठरते.
पुण्यापासून 120 किमी अंतरावर माथेरान आहे. हिरवळ, धबधबे आणि पॅनोरमा, लुईसा पॉइंट्स पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. ट्रेनने किंवा गाडीने इथे जाऊ शकता.
पुण्यापासून 110 किमी अंतरावर असलेलं कोलाड अॅडव्हेंचरसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलिका नदीत राफ्टिंगचा थरार अनुभवता येतो.
पुण्यापासून 100 किमी अंतरावर पांचगणी हे हिल स्टेशन आहे. पावसात टेबल लँड पठार, सिडनी पॉइंट आणि धोम धरण पाहण्यासारखे आहे.
पुण्यापासून 60 किमी अंतरावर तम्हिणी घाट आहे. पावसाळ्यात धबधबे आणि हिरवे डोंगर रोड ट्रिपसाठी उत्तम आहेत.
पावसाळ्यात रस्ते निसरडे असतात, त्यामुळे सावधपणे गाडी चालवा. रेनकोट, पाण्याची बाटली आणि स्नॅक्स सोबत ठेवा.