नेल पेंट जास्त काळ टिकवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Webdunia Marathi May 25, 2025 06:45 AM

Nail Polish Hacks: नखे सुंदर दिसण्यासाठी महिला नेलपॉलिशचा वापर करतात. नेल पॉलिश लावल्यानंतर नखे खूप सुंदर दिसतात पण अनेकदा एका दिवसानंतर रंग फिका पडू लागतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी असे काही हॅक घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने नखांवर बराच काळ नेल पेंट टिकून राहील. या टिप्सच्या मदतीने तुम्ही नखांवर बराच काळ नेल पेंट ठेवू शकता.

ALSO READ:

नेल पेंट दोनदा लावा

नेल पेंट लावताना हे लक्षात ठेवा की तुम्ही जितके कमी नेल पेंट लावाल तितक्या लवकर ते निघून जाईल. यामुळेच नखांवर किमान 2 कोट लावणे आवश्यक आहे. दुसरीकडे जर तुमचा नेल पेंट हलका रंग असेल तर तुम्ही 3 कोट देखील लावू शकता.

थिक नेल पेंट खरेदी करा

अनेक वेळा जास्त खर्च होऊ नये म्हणून आपण स्वस्त नेल पेंट्स खरेदी करतो. असे नेलपेंट लावताना ते दिसायला चांगले असते पण ते नखातून लवकर निघून जातं. अशात नेहमी थिक नेल पेंट खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

ALSO READ:

जेल नेल पेंट कोटिंग करा

कोणत्याही रंगाचा नेल पेंट लावत असाल तर त्यावर जेल नेल पेंट जरूर लावा. हे तुमच्या नेल पेंटमध्ये अतिरिक्त कोट जोडेल आणि ते जास्त काळ टिकेल.

वॉटर प्रूफ नेल पेंट लावा

नखांमधून नेल पेंट निघण्याचे मुख्य कारण पाणी आहे. अशात वॉटर प्रूफ नेल पेंट खरेदी करा. वॉटरप्रूफ नेल पॉलिश नॉर्मन नेल पेंटपेक्षा जास्त काळ नखांवर टिकून राहतं.

ALSO READ:

बोटांवर स्क्रब करणे टाळा

आंघोळ करताना शरीराला घासण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब वापरतो. यामुळे नेलपॉलिशही लवकर निघून जाते. आंघोळ करताना नेल पेंटवर स्क्रब न लावण्याचाही प्रयत्न करावा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.