श्रीराम भट - saptrang@esakal.com
कर्मफलांशी खेळणारे ज्योतिषशास्त्र अध्यात्माशी जवळीक साधत ब्रह्मविद्याही जाणून घेते म्हणा किंवा ब्रम्हहृदयाचे स्पंदन अनुभवेल. भावभावनांच्या मुळाशी जात किंवा त्याची खोली गोठत किंवा तसा योग साधत या असार संसारातील भीती काढून टाकत माणसाल शांतचित्त करण्याचा प्रयत्न करत असते.
मनुष्य, देव आणि राक्षस यांच्या कर्मांच्या आलेखाशी खेळणारे ज्योतिष त्यांच्या कर्मफलांचा रोख निश्चितच जाणते आणि या जाणण्यातूनच अर्थातच त्याच्या जन्म पत्रिकेतील ग्रहाचा किंवा ग्रहयोगाचा अभ्यास करत माणसाचा विशिष्ट ग्रहांचा भ्रांतीचा चष्मा काढून टाकत खरी ज्ञानदृष्टी देत असते. हे ज्ञानदृष्टी देणारे ज्योतिषच वेदांग होऊ शकते आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे...
‘ज्ञानाग्रीचेनि मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे
तो परब्रह्मचि मनुष्य वेखे वोळखू ते
असे हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील योग अभ्यासत खऱ्या ज्ञान योगाकडे वाटचाल करण्यास मदत होत असते.
मित्र हो, ज्योतिष शास्त्रातील शनी हा कर्म फळांशी संबंधित आहे आणि तो छायेचा पुत्र आहे. मी आणि माझे म्हणत माणसं एक प्रकारची छायाच जपत असतो आणि त्यातून मातृछाया आणि पितृछाया हे शब्द अवतरले. अशा या छायापुत्राच्या अर्थातच शनीच्या पार्टीत छायाग्रह राहू मोठी भूमिका निभावत असतो. माणसाला विशिष्ट छायेत जगवत असतो किंवा ग्रहण लावत असतो म्हणा. सप्ताहात उद्या सोमवारी शनैश्चर कुंभ राशीत प्रवेश करत आहे. अर्थातच शनीच्या राजधानीत तो प्रवेश करत आहे. कुंभ ही बुद्धी तत्त्वाची रास आहे. ज्या अमृत कुंभातून ही विश्वनिर्मिती झाली. त्यातील अमृत राहूने चाखले आहे. यात सृष्टीचे मोठे योगरहस्य दडले आहे. ज्ञान आणि अज्ञान यांच्या सरभेसळीतून भ्रांतीचा जन्म होतो आणि भ्रांतीचे लागलेले ग्रहण ज्या वेळी ज्ञानसूर्य डोक्यावर येतो, त्या वेळी ती ‘मी’ म्हणणारी भ्रांतीची छाया जातेच. यामुळे गुरुवारी कुंभ राशीत प्रवेश करणाऱ्या राहूची छाया ज्ञानसूर्याच्या प्रभावात दिसणार नाही.
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यामेष : सप्ताहाचा आरंभ बेरंग करणाराच वाटतो. ता २६ ते २५ च्या अमावस्यच्या प्रभावक्षेत्रात महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. घरातील लहान मुले सांभाळा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात घाईगडबड टाळावीच, बाकी सप्ताहाचा शेवट अर्थातच शुक्रवारचा दिवस मनपसंत गाठीभेटींचा ठरेल. व्यावसायिक क्षेत्रात अनपेक्षित लाभ होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सहली व करमणुकीचे योग आहेत. घरातील स्त्री वर्ग प्रसन्न राहील. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय होतील.
सरकारी कामांमध्ये यश मिळेलवृषभ : राशीतील होणारी अमावस्या घरगुती पर्यावरण बिघडवणारी. प्रिय व्यक्तींची आरोग्य चिंता ग्रासेल. सप्ताहात गर्भवतींनी जपावे. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त व्याधी सतावतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वाद टाळावेत. बाकी ता. २८ ते ३० हे दिवस स्वतंत्र व्यावसायिकांसाठी भाग्यबीजे पेरणारेच आहेत. सरकारी कामातून यश मिळेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ होतील. उत्तम विवाहस्थळे येतील. परदेशात भाग्योदय होण्याची शक्यता.
स्पर्धात्मक पातळीवर यश मिळेलमिथुन : सप्ताहात शुभग्रहांची कनेक्टिव्हिटी राहील. मात्र ता. २६ व २७ च्या अमावस्येचे प्रभावक्षेत्र प्रवासात बेरंग करू शकते. दुष्टोत्तरे टाळा. बाकी ता. २८ ते २९ मे हे दिवस मोठे प्रसन्न राहतील. तरुणांना कला व छंद माध्यमातून फलदायी होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश मिळेल. विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे वाद संपुष्टात येतील. वादग्रस्त स्वरूपाच्या येणे रकमेची वसुली होईल.
नोकरीच्या मुलाखतींमध्ये यशकर्क : सप्ताहात हातापायांच्या दुखापतीपासून सावध राहा. अमावस्येजवळ पैशाचे पाकीट जपा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी कुसंगत टाळावी. खरेदी विक्रीमध्ये फसू नये. बाकी सप्ताह व्यावसायिकांना बुद्धिकौशल्यातून लाभ देईल. तरुणांना नोकरीच्या मुलाखतीतून यश मिळेल. सप्ताहाचा शेवट आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तातून थक्क करेल. व्यावसायिक वास्तुविषयक व्यवहार यशस्वी होतील. भावा-बहिणींचा भाग्योदय होईल.
जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतीलसिंह : उद्याच्या अमावस्येचे फिल्ड विचित्र गाठीभेठीतून छायाग्रस्त ठरू शकते. स्त्री वर्गाशी दुष्टोत्तरे टाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचा विषाणू चांगलाच त्रास देईल. नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. व्यसनांचा अतिरेक नको. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभग्रहांकडून उत्तम रसद पुरवेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअरबाजारातील जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट अपयश धुवून काढेल.
कलाकारांना सूर गवसेलकन्या : सप्ताह घबाडसदृश फळे देईल. मात्र उद्याची अमावस्या संमिश्र परिणाम दाखवणारी आहे. प्रवासात अनपेक्षित अडचणी येतील किंवा बेरंग होईल. बाकी सप्ताहात शनी-बुध युतियोग सप्ताहाच्या शेवटी कलाकारांना चांगलाच सूर लावून देणारे ठरतील. थोरामोठ्यांच्या संपर्कातून लाभ होतील, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचे नैराश्य दूर होईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता.२९ व ३० हे दिवस यशस्वी चौकार-षटकारांचे ठरतील. साधना सफल होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. घरात आनंदाचे वातावरण राहील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन फुलेल.
घोडदौड करणारा कालखंडतूळ : अमावस्येचे प्रभाव क्षेत्र चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शारीरिक वेदनायुक्त व्याधीचे ठरू शकते. काहींच्या बाबतीत विचित्र जागरणाचे प्रसंग उद्भवले जातील. बाकी सप्ताहाचा शेवट शुभग्रहांच्या ताब्यातील राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ ते ३० हे दिवस यशस्वी घोडदौड करणारे ठरतील. व्यावसायिक वाद मिटतील, नोकरीत विशिष्ट परिस्थितीचा लाभ घ्याल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात नोकरीत रजेवर जाण्याचे प्रसंग येतील. या सप्ताहात उच्च रक्तदाबापासून जपाच. घरात वाद-विवाद टाळा.
हितशत्रूंपासून सावधगिरी बाळगावृश्चिक : सप्ताह अमावस्येच्या पार्श्वभूमीवर जपाच, मानसिक संतुलन ठेवाच. नोकरीत हितशत्रू पीडा होऊ शकते अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींनी उद्याच्या अमावस्येच्या प्रभावात चोरी नुकसानींचे प्रसंग टाळावेत. अतिशय दक्षता बाळगा, बाकी सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण पूर्ण ताकदीने फळे देईल. प्रिय व्यक्तींची विशिष्ट गुप्तचिंता जाईल. सप्ताह परदेशस्थ तरुणांना उत्तमच राहील, परदेशात विवाह प्रकरण मार्गी लागेल. सतत ऑनलाइन राहाच, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अन्नसंसर्ग होऊ देऊ नये.
राजकारण्यांना उपद्रवकारक कालखंडधनु : सप्ताहात अमावस्येला धरून ग्रहांचे फिल्ड उच्च दाबाचे राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी या उच्च दाबापासून सावध राहावेच. काहींना विचित्र मानवी उपद्रव होईल. राजकीय व्यक्तींना अमावस्येचे पॅकेज मोठेच उपद्रवी ठरू शकते. बाकी सप्ताहाचा शेवट अर्थातच ता. २८ ते २९ हे दिवस उमलत्या तरुणाईला छानच राहील. काहींना गॉडफादर भेटतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ऐन उकाड्यात गारवा मिळेल. काहींना मित्रसंगतीतून लाभ होतील उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट गुप्तचिंता जाईल.
नोकरीत बढतीची शक्यतामकर : सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये पाळाच. काहींना अमावस्येजवळ पित्तप्रकोप होऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना आहाराबाबतची पथ्ये पाळावीच लागतील, काहींना ज्वरपीडा सतावेल. गर्भवतींनी सप्ताहात सर्व पथ्ये पाळावीत. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह शुभग्रहांच्या पुरवठ्यातून तारून नेईलच. सप्ताहाचा शेवट नोकरी-व्यावसायिक सुवार्तांतून प्रसन्न ठेवेल. मुलाबाळांचे प्रश्न सुटतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० चा शुक्रवार नोकरीतील ताणतणाव कमी करणाराच, बढतीची चाहूल लागेल.
संमिश्र वातावरण राहीलकुंभ : उद्याची अमावस्येची पार्श्वभूमी संमिश्ररीत्या फलदायी होऊ शकते. घरी वा दारी विशिष्ट वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक संतुलन सांभाळाच. नवपरिणितांनी निश्चितच आचारसंहिता पाळावी. बाकी ता. २८ ते ३० हे दिवस शुक्रकलांचा उत्कर्ष करत गुरुभमणालाही उत्तम साथ देतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल. होतकरू तरुणांना परदेशी संधी मिळतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वास्तुखरेदीतून लाभ होईल. पती वा पत्नीचा भाग्योदय चकित करणारा ठरेल.
परदेशामध्ये संधी मिळतीलमीन : सप्ताहातील अमावस्या घरी किंवा बाहेर विचित्र वादात पाडू शकते, कोणाबरोबरही गैरसमज होऊ देऊ नका. भावाबहिणींची मानसिकता जपा, संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. बाकी ता. २८ ते ३० या दिवसांत शुभग्रहांचे फिल्ड गतिमान राहील. होतकरू तरुणांचे भाग्य उलगडेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट परदेशी संधी देणारा आहे. परदेशातील तरुणांचे विवाह ठरतील. व्यावसायिक नव्या पर्यायातून मोठा भाग्योदय होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. ३० चा शुक्रवार मोठया जल्लोषाचा व मानसन्मानाचे योग आणणारा आहे.