PBKS vs DC : समीर रिझवीचं वादळी अर्धशतक, दिल्लीचा शेवट गोड, पंजाब किंग्सला मोठा झटका
GH News May 25, 2025 02:05 AM

समीर रिझवी याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लसने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. दिल्लीने पंजाब किंग्सवर 6 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 3 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 19.3 ओव्हरमध्ये 208 रन्स केल्या. दिल्लीचा हा सातवा विजय ठरला. तर या पराभवामुळे पंजाबच्या टॉप 2 मिशनला मोठा झटका लागला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.