Nashik : मर्सिडीजसाठी २५ लाख आण, IT इंजिनियर पतीकडून डॉक्टर पत्नीचा छळ
Saam TV May 25, 2025 08:45 PM

तबरेज शेख, नाशिक प्रतिनिधी

Nashik IT engineer harasses wife for Mercedes : वैष्णवी हागवणे या हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. पुण्यातील या प्रकरणानंतर आता राज्यभरातील इतर हुंड्याची प्रकरणं समोर येत आहेत. नाशिकमध्ये लागोपाठ दोन दिवस अशी दोन प्रकरण समोर आली आहे. भक्ती गुजराती प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच आता आणखी एक हुंड्याचे प्रकरण समोर आले आहे. आयटी इंजिनियर नवऱ्याने मर्सिडीजसाठी बायकोचा छळ केल्याचं उघड झाले आहे.

आयटी इंजिनियर पतीने डॉक्टर पत्नीचा पैशासाठी छळ केला. मर्सिडीज कार घेण्यासाठी माहेरकडून २५ लाखांची मागणी त्याने केली होती. त्यासाठी त्याने वारंवार पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे समोर आलेय. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे.

सध्या महिला आणि महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक महिला अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मर्सिडीज कारची मागणी करत माहेरून २५ लाख रुपये आणण्यासाठी स्नेहल घुले या डॉक्टर पत्नीचा आयटी इंजिनिअर पतीकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी महिलेचा पती, सासू- सासरे आणि दीर- नणंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.