Latest Marathi News Live Updates :अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग
esakal May 25, 2025 08:45 PM
Live : अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग

अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे,या पावसाने मात्र आता जनजीवन विस्कळीत झाले आहे, उन्हाळी शेती पिकांचे अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे, तर 31 मे पर्यंत पावसाचा इशारा अमरावती जिल्ह्यासह विदर्भात देण्यात आला आहे,सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे मान्सूनपूर्व शेती मशागतीचे काम पूर्णपणे थांबली आहे, आजपासून तीन दिवस अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे,

Solapur live : जुळे सोलापुरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा; नागरिकांचे हाल सुरूच

जुळे सोलापूर येथील गुरुदत्त नगर, पाटलीपुत्र नगर, मिरा पिठाची गिरणी या परिसरातील अंतर्गंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे.

या मार्गावर सर्वत्र चिखल झालेला आहे. या परिसरातील सर्व रस्ते चिखलमय झालेल आहेत. अनेक मार्गावरील डांबरीकरण उखडलेले आहे तर काही मार्गावर अद्याप डांबरीकरणच झालेले नाही. यामुळे सर्वत्र चिखल झालेला असून रस्ते निसरडे झालेले आहेत.

या परिसरातील नागरिकांचे रस्त्याअभवा हाल होत आहेत. येथील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांमधून होत आहे

Live: विराट-अनुष्काचे रामनगरीत दर्शन, घेतले श्रीरामलल्ला व हनुमानगढीचे आशीर्वाद

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिर आणि हनुमानगढी मंदिरावर नमन केला. त्यांनी महंत संजय दास यांची भेट घेऊन आशीर्वादही घेतले.

Live: मोदींच्या 'मन की बात' मध्ये ITBP चं कौतुक, माउंट मकालूवर इतिहास घडवणारे पहिले केंद्रीय पोलीस

मोदींच्या 'मन की बात' मध्ये ITBP चं कौतुक, माउंट मकालूवर इतिहास घडवणारे पहिले केंद्रीय पोलीस

Live : लोहगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून महिलेने केला स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न

बापाला गाडी द्यायला सांग नवऱ्याची मागणी, तू तर पांढऱ्या पायाची सासूची धमकी

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने केले विषप्राशन

पुण्यातील लोहगाव भागातील धक्कादायक घटना

सुनेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

२३ वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे

यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार

यांच्या विरोधात गुन्हा दाखल

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी २२ मे २०२२ मध्ये लग्न झालं होत. लग्नाच्या ६ महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवार ने फिर्यादी यांना "तु माहेरावरुन काय आणले आहेस तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही" असं म्हणाली.

पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना "मी तुझ्याशी टाईमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेवून देण्यास सांग तुझ्या बापाला," असं म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. असं म्हणताच पती ने पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली. फिर्यादी यांचे दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे

अर्जेंटिनातील रोझारियो येथे झालेल्या फोर नेशन्स स्पर्धेत भारताने चिलीवर २-१ असा रोमांचक विजय मिळवला

अर्जेंटिनातील रोझारियो येथे झालेल्या फोर नेशन्स स्पर्धेत भारताने चिलीवर २-१ असा रोमांचक विजय मिळवला.

Monsoon LIVE : मान्सून गोव्याच्या वेशीवर

मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला आहे असा हवामानाने अंदाज दर्शवला आहे.

LIVE : अवकाळी पावसामुळे मच्छीमारीला ब्रेक

वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरांमध्ये दाखल

यावर्षीचा मच्छिमारी हंगाम तोट्यात

मासेमारी हंगाम संपायला अजून 6 दिवस बाकी, मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यातही वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

शेवटच्या टप्प्यातील 25 कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प

जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट

वादळी पावसाची शक्यता, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन

वादळी पावसाच्या या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी नौका आणल्या बंदरात

मच्छिमारांना सहन करावा लागतोय मोठा आर्थिक फटका

Pune Live : पुण्यात पीएमपी बस खड्ड्यात अडकली

पुण्यात पीएमपी बस खड्ड्यात अडकली

महापालिकेच्या कामांचा निष्काळजीपणा

भर पावसाळ्यात पुणे महापालिकेने रस्त्यावर खोदाई काम करत आहे

मात्र हे करत असताना कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीये

त्यामुळे वारजे माळवाडी बस स्टॉप येथील मोठ्या खड्ड्यात बसची चाके अडकले

सुदैवाने कोणतीही जखमी नाही

आज सकाळी हा अपघात झाला आहे

मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी, पेरणीपूर्व कामांमध्ये अडथळा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात आज सकाळपासून पूर्व मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत खोळंबली आहे. हवामानात निर्माण झालेला अस्थिरतेचा कल आणि वेळेआधी आलेल्या पावसामुळे शेतकरी संभ्रमित झाले असून, शेतीची कामे पुढे ढकलावी लागणार आहेत. ज्या भागांत अजून पेरण्या सुरू झाल्या नाहीत, तिथे पावसाचे पाणी साचल्याने मशागत करणे कठीण झाले आहे. यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीसच अडथळे निर्माण होताना दिसत आहेत.

Tamilnadu Live : शिवकाशीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

तामिळनाडूतील शिवकाशीजवळ फटाके बनवण्याच्या कारखान्यात स्फोट झाला असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.

Delhi Live : भर उन्हाळ्यात दिल्लीत तूफान पाऊस, अनेक भागांत पाणी साचले

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे वादळ आणि जोरदार पाऊस पडला. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. मिंटो रोड, एअरपोर्ट टर्मिनल १ तसेच मोतीबागमध्ये पाणी साचल्याने अडचण निर्माण झाली आहे.

AJit Pawar Live : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले, एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी दिल्लीत पोहोचले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.