इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी दोन सामने होत असून दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. हा स्पर्धेतील ६८ वा सामना असून दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
हा दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील हा अखेरचा सामना आहे. हे दोन्ही संघ यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे रविवारी होणारा अखेरचा सामना हा दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. दोन्ही संघ विजयासह शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी हैदराबादने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. तसेच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातीव कोलकाता नाईट रायडर्सनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
प्लेइंग इलेव्हनकोलकाता नाइट रायडर्स: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, एनरिक नॉर्किया, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्यायसनरायझर्स हैदराबादचे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूटसाठी पर्याय: मोहम्मद शमी, हर्ष दुबे, सचिन बेबी, झीशान अन्सारी, सिमरजीत सिंग.
कोलकाता नाइट रायडर्सचे इम्पॅक्ट सब्स्टिट्युटसाठी पर्याय: अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया
१३ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ६ सामने पराभूत झाले आहेत. त्यांचे २ सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे त्यांचे १२ गुण आहेत. कोलकाता ७ व्या क्रमांकावर आहेत.
१३ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ७ पराभव स्वीकारले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे त्यांचे ११ गुण आहेत. ते ८ व्या क्रमांकावर आहेत.
त्यामुळे आता या दोन्ही संघांना हा सामना जिंकून लखनौ सुपर जायंट्सला मागे टाकून ६ व्या क्रमांकावर येण्याची संधी आहे. लखनौ १२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील विजय मिळवणारा संघ ६ व्या क्रमांकावर येईल.
आमने-सामने आकडेवारीसनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आत्तापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ९ सामने सनरायझर्स हैदराबादने जिंकले आहेत, तर २० सामने कोलकाता नाईट रायडर्सने जिंकले आहेत.
यंदाच्या हंगामात जेव्हा कोलकातामध्ये हे दोन संघ आमने सामने आले होते, तेव्हा कोलकाताने ८० धावांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे गेल्या ४ सामन्यात कोलकातानेच हैदराबादविरुद्ध विजय मिळवला आहे.