Webdunia Marathi May 28, 2025 07:45 AM

Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना यूबीटी खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरवरील विधानामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राऊत यांच्या या विधानानंतर महायुतीचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनीही उद्धव गटाच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे आणि पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आता एका माजी आमदाराचा पावसामुळे गाडी घसरल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ हा अपघात झाला. जेव्हा देशमुख एसयूव्हीमधून तुळजापूर-लातूर रस्त्यावरून जात होते.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे एकीकडे लोकांचे हाल होत असताना, दुसरीकडे एका छोट्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एका तरुणाला मारहाण झाल्याची बातमी आहे. रस्त्यावरील मेस बॉक्स देण्यासाठी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या पायावर रस्त्यावर साचलेले पाणी पडल्याने 4 जणांनी बाइकस्वाराला लोखंडी रॉडने मारहाण केली.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकाचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील सह पाच जणांना अटक केली आहे. प्रीतम पाटील याने फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांना मदत केल्याचा आरोप आहे

सध्या राज्यात पावसाने झोडपले आहे. मुंबईत अनेक भाग पाण्याखाली गेले आहे. या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना घरातच राहण्याचा, अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.सोमवारी सकाळपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे.

पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात एका भरधाव एसटी बसने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहे.राहुल तुपे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ....

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मान्सून नियोजित वेळेपेक्षा 15 दिवस आधीच दाखल झाल्याने मे महिन्यात सर्वाधिक पावसाचा 107 वर्षांचा जुना विक्रम मोडला. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आणि अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने हजारो लोक अडकून पडले.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे एकीकडे लोकांचे हाल होत असताना, दुसरीकडे एका छोट्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एका तरुणाला मारहाण झाल्याची बातमी आहे. रस्त्यावरील मेस बॉक्स देण्यासाठी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या पायावर रस्त्यावर साचलेले पाणी पडल्याने 4 जणांनी बाइकस्वाराला मारहाण केली.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकाचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील सह पाच जणांना अटक केली आहे. प्रीतम पाटील याने फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांना मदत केल्याचा आरोप आहे..

COVID-19 News: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) संसर्गामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळ गढी पुलावर मोठ्या अपघातात ट्रक ने चिरडून सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडला कार दुभाजकाला धडकली .मात्र कारमधील सर्व जण बचावले. नंतर कार दुभाजकावरून काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले.

सध्या राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सर्वत्र पावसाने झोडपले आहे. रस्ते पाण्याच्या खाली गेले आहे. राज्यातील काही भागात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरात रेल्वे पुलाखाली अडकलेल्या बस मधून अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

राज्य वाहतुकीसाठी ई-बसबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक बसेस पुरवणाऱ्या कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे.सोमवारी, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी निर्देश

मुंबईत मान्सून येण्याआधीच मुसळधार पावसाने कहर केला आहे. अलिकडेच, वरळी भूमिगत मेट्रो स्टेशन पावसाच्या पाण्याने भरले होते. त्याच वेळी, बीएमसीने सांगितले की मुंबईत पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे.

मुंबईतील भायखळा परिसरातील एका महिलेने तिच्या पुतण्याने मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ५० दिवसांनंतर, आरोपीने आत्मसमर्पण केले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्व बँका, रेल्वे आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली आहे. सरकारने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. अंमलबजावणीची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी उपमुख्यमंत्री अजित यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा थेट संबंध असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारच्या कारभारावर आधीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता राज्य सरकारची बदनामी करणारे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

सोमवारी विरारमध्ये मुसळधार पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून एका ३५ वर्षीय आईचा मृत्यू झाला तर तिची मुले जखमी झाली. महानगरपालिकेने जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) तात्काळ इतर रहिवाशांना ती रिकामी करण्याची नोटीस बजावली. मृत लक्ष्मी सिंग ही गृहिणी तिच्या दुसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये तिच्या सात महिन्यांच्या बाळासह आणि तीन वर्षांच्या मुलासह होती, तेव्हा तिच्या डोक्यावर स्लॅब पडला आणि ती गंभीर जखमी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये अचानक प्रवेश हा अजित पवारांवरील त्यांच्या नाराजीचा शेवट मानला जात होता, परंतु भुजबळ मंत्री झाल्याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना देत आहे. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले असल्याचे सांगितले जात आहे.

६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याप्रकरणी सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाची चौकशी केली. या चौकशीनंतर अभिनेत्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका मोठ्या कारवाईत, नाशिक, कोपरगाव आणि ठाणे येथील मेसर्स केजीएस शुगर अँड इन्फ्रा कंपनीशी संबंधित संचालकांच्या व्यावसायिक आणि निवासी जागेवर छापे टाकले. बनावट कागदपत्रांचा वापर करून कर्जे घेतल्याच्या कथित ₹३५० कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा मंगळवारी संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शाह यांनी मुंबईत काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

मुळशीच्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात, वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे झाले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे, पोलिसांनी सासू, पती आणि नणंद यांना कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.