- श्रीकांत पाटील
स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. कौशल्याधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अधिक फायदेशीर ठरत आहेत. यातील आशादायक क्षेत्र म्हणजे टूल अँड डाय मेकिंग. हे क्षेत्र विद्यार्थ्यांना थेट औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देते.
इंजेक्शन मोल्डिंग उद्योग
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती स्वीकारार्हता लक्षात घेता, ऑटोमोबाईल क्षेत्रात इंजेक्शन मोल्डिंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. याचवेळी, वैद्यकीय उपकरण क्षेत्रही वेगाने विस्तारत असून, सिरिंजेस, कॅथेटर्स, इम्प्लांट्स यांसारख्या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
टूल अँड डाय मेकिंग म्हणजे काय?
या क्षेत्रात विविध उत्पादन उद्योगांसाठी टूल्स व डायज (मोल्ड्स, स्टॅम्पिंग डायज, रबर मोल्ड्स इत्यादी) डिझाइन व तयार करण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक कौशल्यांचा समावेश होतो. या अभ्यासक्रमात डिझाइन, मशिनिंग, सीएनसी ऑपरेशन, क्वॉलिटी कंट्रोल हे शिकवले जाते.
शिक्षण व करिअर संधी
पदव्युत्तर अभ्यासक्रम - कॅड/कॅम डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, सीएनसी, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग
सॉफ्टवेअर कोर्सेस - कॅटिआ, युनिग्राफिक्स - डिझाइन व मोल्डिंगसाठी
कॅम प्रोग्रॅमिंग - मास्टरकॅम, सॉलिडवर्कस् कॅम,
उपलब्ध नोकरी - टूल मेकर, टूल डिझायनर, टूल मेंटेनन्स टेक्निशियन, कॉस्टिंग इंजिनिअर, मोल्ड डिझायनर, प्रोसेस इंजिनिअर, कॅम प्रोग्रॅमर
उद्योजकतेच्या संधी - स्वतःची टूल-मेकिंग कंपनी, टूल डिझाइन कन्सल्टंसी, सीएनसी मशिनिंग सेवा केंद्र, फिनिशिंग आणि पॉलिशिंग सेवा
स्टॅम्पिंग डायजचा वापर
स्टॅम्पिंग डायज मेटल शीट्सना विशिष्ट आकार देण्यासाठी किंवा कापण्यासाठी वापरले जातात. हे विविध उद्योगांमध्ये अचूक आणि मोठ्या प्रमाणात घटक तयार करण्यासाठी वापरले जातात.
स्टॅम्पिंग डायज वापरून तयार होणारी उत्पादने
ऑटोमोबाईल उद्योग - कारचे बॉडी पॅनेल्स (दरवाजे, बोनेट, फेंडर), चेसिस घटक, सीट फ्रेम्स व ब्रॅकेट्स, इव्हीसाठी बॅटरी कव्हर्स, रिइन्फोर्समेंट प्लेट्स
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स - मोबाईल कव्हर्स, लॅपटॉप फ्रेम्स, बॅटरी कनेक्टर्स, हीट सिंक्स, यूएसबी, एचडीएमआय पोर्ट कव्हर्स
गृहोपयोगी उपकरणे - वॉशिंग मशिन ड्रम्स, मायक्रोवेव्ह पॅनेल्स, फ्रिज शेल्फ व ब्रॅकेट्स, इलेक्ट्रिकल आउटलेट कव्हर्स
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स - स्विचगिअर कंपोनंट्स, बस बार व टर्मिनल्स, कनेक्टर पिन्स, सर्किट ब्रेकर हाउजिंग
औद्योगिक उत्पादने - कंट्रोल पॅनल कव्हर्स, मशिन ब्रॅकेट्स, गिअरबॉक्स प्लेट्स, मोटर माउंटिंग प्लेट्स
टूल अँड डाय मेकर्स हे चेकिंग फिक्स्चर व गेजेस क्षेत्रात करिअर करू शकतात. हे घटक उत्पादन प्रक्रियेत मोजमाप, अचूकता व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक असतात. यांचा वापर मुख्यतः ऑटोमोबाईल, एरोस्पेस, अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगांमध्ये होतो.
निष्कर्ष
टूल अँड डाय मेकिंगमधील करिअर नोकरीची शाश्वती तर देतेच, त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि जागतिक स्तरावर काम करण्याची संधीही उपलब्ध करून देते.