आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मे 2025
esakal May 29, 2025 11:45 AM

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय सकाळी ७.२९, चंद्रास्त रात्री ९.५०, रंभाव्रत, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ८ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००४ - भारतात तयार करण्यात आलेल्या ‘सारस’ या पहिल्या प्रवासी विमानाची ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या विमानतळावर यशस्वी चाचणी.

  • २०१० - चीनच्या लुयॉँग परिसरात भारतीय शैलीचे अतिशय सुंदर बुद्धमंदिर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चिनी जनतेला अर्पण.

  • २०१४ - चंडीपूर येथील शस्त्रास्त्र तळावर भारतीय बनावटीच्या पिनाक रॉकेट प्रक्षेपक यंत्रणेची यशस्वी चाचणी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.