केसगळती व त्वचेच्या समस्या
esakal May 29, 2025 11:45 AM

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

आजकाल किशोरवयीन मुलींपासून वयस्क स्त्रियांपर्यंत बहुतांश महिलांना केसगळती, टक्कल पडणे, केस पातळ होणे, त्वचेवर पुरळ, डाग, कोरडेपणा, ग्लोचा अभाव अशा समस्या भेडसावत आहेत. या समस्या दवाखान्यातील औषधांव्यतिरिक्त योग, प्राणायाम, ध्यान, संतुलित आहार व दिनचर्येच्या सुसंगतीनेही दूर करता येतात.

योगासने

अधोमुख श्वानासन : डोक्यात रक्तपुरवठा वाढतो, केसांच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो.

कसे करायचे? : पाय व हात जमिनीवर ठेवून शरीर उलट ‘V’ आकारात आणा. श्वास घेत-श्वास सोडत राहा.

फायदे : केसगळती कमी होते, चेहऱ्यावर तेज वाढते.

उत्तानासन : पाचन सुधारते, हार्मोन्स संतुलित होतात.

कसे करायचे? : सरळ उभे राहून श्वास सोडत पुढे वाकायचं. गुडघे शक्यतो सरळ.

फायदे : रक्ताभिसरण वाढते, त्वचा स्वच्छ होते.

सर्वांगासन : थायरॉईड कार्य सुधारते, केसांची गुणवत्ता वाढते.

फायदे : त्वचा चमकदार, केस मजबूत.

(टीप : अनुभव नसल्यास प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.)

मस्तिष्कासन (प्रगत) : मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा, तणावमुक्ती. (टीप : फक्त प्रॅक्टिस केलेल्यांनी करावे.)

प्राणायाम : तणावमुक्ती आणि ऊर्जावान त्वचा/केसांसाठी

अनुलोम-विलोम : हार्मोनल बॅलन्स साधतो, मन शांत करतो.

भस्रिका प्राणायाम : ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतो, त्वचेचा ग्लो वाढतो.

कपालभाती : पाचन सुधारते, टॉक्झिन्स बाहेर टाकतो, त्वचेला उजळपणा मिळतो.

सूचना : श्वासावरील नियंत्रण आवश्यक. झोपेच्या आधी टाळावे.

ध्यान : अंतःप्रेरणेचे आरोग्याशी नाते

दररोज १० मिनिटांचे ध्यान, ‘मी निरोगी आहे’, ‘माझे केस आणि त्वचा तेजस्वी आहेत’ अशा सकारात्मक प्रतिध्वनींचा उपयोग. (योगनिद्राही प्रभावी ठरू शकते).

आहार : केस व त्वचेसाठी बळ देणारा

सकाळी : भिजवलेले बदाम, अंजीर, खजूर. आवळा ज्यूस किंवा हर्बल टी (तुळस, आले)

दुपारी : ताजी भाजी, मुगडाळ, तूप, ताक. ज्वारी/नाचणी भाकरी.

सायंकाळी : फळे (पपई, संत्री, चिकू), नट्स, ग्रीन टी

रात्री : हलकी खिचडी किंवा भाज्यांची पोळी. झोपेपूर्वी एक चमचा गाईचे तूप

वर्ज्य करावे : साखरयुक्त पदार्थ, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर. फ्रीजमधील/डबाबंद अन्न. कोल्ड ड्रिंक्स व रासायनिक पदार्थ

घरगुती उपाय

  • आवळा, मेथी, भृंगराज हे नैसर्गिक केसवाढीसाठी फायदेशीर

  • सप्ताहातून एकदा केसांवर शिकेकाई व रिठायुक्त घरगुती शांपू

  • त्वचेसाठी बेसन, हळद, गुलाबपाणी यांचा फेसपॅक लावावा

शरीरातील बदलांचे प्रतिबिंब आपल्या केसांवर आणि त्वचेवर पडते. त्यामुळे मूळ कारणांवर काम करणे गरजेचे असते. योग, प्राणायाम, आहार व ध्यानाचा एकत्रित वापर केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर आरोग्यदृष्ट्याही दीर्घकालीन लाभदायक ठरतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.