Vaishnavi Hagawane case anil kaspate answer to rajendra hagawane lawyer allegation
Marathi May 29, 2025 09:25 PM


पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंब सध्या तुरुंगात आहे. याप्रकरणी बुधवारी (28 मे) पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी हगवणे यांच्या वकिलांकडून वैष्णवीबद्दल युक्तिवाद करण्यात आला. यामध्ये त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. एकीकडे याबाबत सध्या महाराष्ट्रात वातावरण तापले असतानाच वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचे खंडन केले आहे. (Vaishnavi Hagawane case anil kaspate answer to rajendra hagawane lawyer allegation)

हेही वाचा : Global Climate Forecast : पुढच्या 5 वर्षांत पृथ्वीचे तापमान इतक्या अंशांनी वाढणार, जागतिक हवामान संघटनेचा इशारा 

न्यायालयामध्ये वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला. यावर तिचे वडील म्हणाले की, “वैष्णवीच्या मोबाइल चॅटबाबत मला हगवणे कुटुंबाने कोणतीही माहिती दिलेली नाही. वैष्णवी सध्या या जगात नाही, आणि आता तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत आहे. मी मोबाइल काढून घेतलेला नाही. मी माझ्या मुलीला मोबाइल दिलाच होता तर शशांक हगवणेने मागणी केल्यानंतर मी त्याला तब्बल दीड लाखांचा मोबाइल घेऊन दिला होता. वाकड येथील क्रोमा या ठिकाणी शशांक आला, माझ्या मुलीला त्याने बोलवून घेतले. तिथे त्याने वैष्णवीकडे मागणी केली की तुझ्या पप्पांना सांग मला मोबाइल हवा आहे. मला वैष्णवीने फोन करून तिथे बोलवून घेतले. 18 सप्टेंबर 2024 ला मोबाइल घेऊन दिला. त्या मोबाइलचे हप्ते आजही मी भरतो आहे.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच, हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या असताना ते 40 लाखाच्या गाडीची मागणी का करतील? असा असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला होता. त्यावर ते म्हणाले, “गाडी मागितली नाही म्हणता तर मग मी एमजी हॅक्टर गाडी बुक केली होती. ती मी रद्द केली कारण त्यांनी वाद घालून फॉर्च्युनर मागून घेतली. बैठकीत वादावादी झाली होती फॉर्च्युनरच हवी असा हट्ट धरला होता. त्यांच्याकडे ही एकच गाडी आहे. हगवणे कुटुंबाकडे कोणतीही गाडी नाही.” असे त्यांनी सांगितले. “वैष्णवीला पाच ते सहा दिवस मारहाण सुरू होती. वैष्णवी 10 मे रोजी जेव्हा इथे आली होती, तेव्हा तिने आईलाही ही बाब सांगितली होती. ती म्हणाली होती की, तिला मारहाण केली जाते आहे. तिचा छळ होत होता. त्यानंतर 11 मे रोजी तिला फोन आला त्यामुळे तिला जावे लागले” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.