''भाभा'' रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. टकले यांची बांद्याला भेट
esakal May 30, 2025 01:45 AM

swt2910.jpg
66996
बांदाः डॉ. संतोष टकले व वैशाली पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना बाळू सावंत, नीलेश कदम व नीलेश मोरजकर.

‘भाभा’ रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ
डॉ. टकले यांची बांद्याला भेट
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ः कोकण हे नितांत सुंदर आहे. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्याबरोबरच कोकणी लोकांचा स्वभाव व मैत्री ही जिव्हाळ्याची आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा पुन्हा यावेसे वाटते, असे गौरवोद्गार भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांनी येथे काढले.
डॉ. टकले हे मुंबई येथून गोवा येथे जात असताना काही काळ बांदा येथे थांबले होते. यावेळी त्यांचे बांद्याचे माजी उपसरपंच तथा बांदेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, सामाजिक कार्यकर्ते नीलेश कदम, पत्रकार नीलेश मोरजकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वैशाली पाटील उपस्थित होत्या.
डॉ. टकले हे ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असून त्यांनी आतापर्यंत संपूर्ण भारतात तारांगण, अंतराळ या विषयांवर हजारो अभ्यासिका घेतल्या आहेत. टकले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना घडविले आहे. कोकणात यायला आपल्याला विशेष आवडते, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिकांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.