राजनाथ सिंग नावाच्या आंबा विविधता
Marathi May 30, 2025 11:25 AM

लखनौच्या मँगो मॅनने दिले गिफ्ट

वृत्तसंस्था/लखनौ

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने दहशतवादी आणि त्यांना आ़श्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात धडक कारवाई केली आहे. या यशस्वी मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भारतीय सैन्याला दिले जात आहे. याचबरोबर संरक्षणमंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह  यांनीही ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. हेच यश पाहता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आंब्याची एक प्रजाती समर्पित करण्यात आली आहे. विशेष प्रकारच्या आंब्याला आता ‘राजनाथ’ हे नाव देण्यात आले आहे. लखनौच्या मलीहाबाद क्षेत्रातील पद्मश्री हाजी कलीमुल्लाह खान यांना ‘मँगो मॅन’ नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आंब्याची एक प्रजाती समर्पित केली आहे. राजनाथ सिंह हे अत्यंत चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वात संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबविले असून ते अत्यंत यशस्वी ठरले आहे. लखनौमध्ये त्यांचा मोठा सन्मान केला जातो, असे खान यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.