Vaishnavi Hagwane | हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड, फसवणूक करुन मिळवले शस्त्र परवाने, दोघांवर गुन्हा
Marathi May 30, 2025 05:26 PM

Vaishnavi Hagwane | हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा उघड, फसवणूक करुन मिळवले शस्त्र परवाने, दोघांवर गुन्हा

सुशील आणि शशांक हगवणे यांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केली होती. तो अर्ज मंजूर करून घेण्यासाठी त्यांचे मामा आणि तत्कालीन पोलीस अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची सही असल्याचं उघड झालंय. बनावट कागदपत्रांची खातरजमा न करता पोलिसांनी अर्ज मंजूर केला होता. त्यावर जालिंदर सुपेकर यांची सही होती. शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय  घेण्यासाठी पाच जणांची समिती असते. ज्यात पोलीस आयुक्त , सह पोलीस आयुक्त , अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडुन भाच्यांच्या शस्त्रपरवान्याची फाईल मंजुर करुन घेतली आणि नोव्हेंबर २०२२ मधै परवान्यावर सही केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.