ALSO READ:
पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील लांबी भागात असलेल्या फटाके बनवण्याच्या आणि पॅकेजिंग कारखान्यात मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 30 जण जखमी झाले.
ALSO READ:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री उशिरा 1 वाजण्याच्या सुमारास झाला. लांबी येथील पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) जसपाल सिंह यांनी सांगितले की, सिंघवली-कोटली रोडवरील एका दुमजली कारखान्यात हा स्फोट झाला जिथे स्थलांतरित कामगार काम करत होते. अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे.जखमींना एम्स भटिंडासह विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बहुतेक जखमींची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे सांगितले आहे.
ALSO READ:
कारखान्याच्या बांधकाम ब्लॉकमधील एका खोलीत स्फोट झाला, ज्यामुळे छत कोसळले. या ढिगाऱ्यामध्ये अनेक लोक गाडले गेले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले.
स्फोटाचे कारण तपासले जात आहे.
Edited By - Priya Dixit