राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी जनसुनावणी घेतली. कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया आहे. कुटुंबासंदर्भात कोणतीही तक्रार आली, तर लगेच टोकाची भूमिका घेता येत नाही. न्यायप्रकिया कुटुंब एकत्र करण्यावर भर देते. जोडणं हे काम आहे, तोडणं नाही” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांच्या स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते”
संरक्षणमंत्र्यांची INS विक्रांतला भेटऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धनौका INS विक्रांतला भेट दिली. राजनाथ सिंह यांनी यावेळी नौदलातील जवानांशी संवाद साधला.
Nashik LIVE: ढेकळांचे पंचनामे करणार का?; कृषीमंत्री कोकाटेंचे वादग्रस्त वक्तव्यकृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.नाशिकच्या सिन्नरमध्ये पीक नुकसान पाहणीवेळी कोकाटे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? असे कोकाटे म्हणाले. ढेकळांचे पंचनामे करणार का? असा संतप्त सवाल कोकाटे यांनी केला.
kolhapur live: 'गोकुळ'च्या अध्यक्ष पदासाठी अडीच तास खलबत्तमहायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी जवळपास अडीच तास खलबत्त झाली. आज संचालक मंडळाच्या मीटिंग समोर धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरके, नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे आणि अमर पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nagpur News : पाकिस्तानात गेलेली नागपूरची महिला भारतात परतलीएलओसीवरून बेपत्ता झालेल्या सुनीता जमगडे या नागपूरमधील महिलेचा अखेर शोध लागला आहे. या महिलेला पाकीस्तान प्रशासनाने भारतीय बीएसएफकडे सोपवलं आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर सुनीताला नागपूरला आणलं गेलं. पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा औपचारिकरित्या अटक केल्यानंतर तिला रात्री विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असून तिला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Pune Crime : हगवणे बंधुंकडून पिस्तूल परवान्यासाठी पोलिसांची फसवणूकवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचं आणखी एक कारणामा उघडकीस आला आहे. तो म्हणजे या दोघांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी चक्क पोलिसांना खोटी माहिती दिल्याची बाब समोर आली आहे. या दोघांच्या पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Kolhapur Politics : गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच पाहिजे - CM फडणवीसकोणालाही करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे' असा आदेशच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण मिळालं आहे. मुंबईतील बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज दुपारी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
Mumbai Police : मुंबई पाेलिसांना मिळणार डिजिटल ओळखपत्रबनावट ओळखपत्राद्वारे पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह विभागाकडून मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार कोटींच्या निधीस गृह खात्याने मंजुरी दिली आहे.
Dhananjay Munde : धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखलअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मागील आठ दिवसांपासून नाशिक येथील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झालेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनाम्यानंतर त्यांच्या आमदारकीचा देखील राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. शिवाय त्यांच्यावर पत्नी करूणा शर्मा यांनी देखील गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सतत चर्चेत होते. त्यानंतर आता अखेर मन:शांतीसाठी मुंडे आता थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची माहिती आहे.
BJP Politics : ग्रामपंचायत ते विधानसभा, भाजप हीच काळाची गरज - रवींद्र चव्हाणग्रामपंचायत ते विधानसभा शत प्रतिशत भाजप हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यानुसार सशक्त भारत निर्माण करायचा आहे. भाजप हीच काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रत्येकाने पावले उचलायला हवीत, असं आवाहन भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कराड येथील महिला मेळाव्यात बोलताना केले.