Delhi News : महादेव जानकरांच्या कार्यक्रमास बड्या नेत्यांची अनुपस्थिती
esakal June 01, 2025 04:45 AM

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये भरपूर गाजावाजा आणि वातावरण निर्मिती केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे राजधानी दिल्लीतील संभाव्य शक्तिप्रदर्शन फारसे झालेच नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभासाठी शरद पवार, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची ‘हजेरी’ तालकटोरा स्टेडियमच्या परिसरात ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर-पोस्टर्सपुरतीच सीमित  झाली.

दिवसभरातील घडामोडी दरम्यान या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अखिलेश यादव उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जानकर यांची भिस्त राहुल गांधी यांच्यावर होती. या कार्यक्रमाची भरपूर पूर्वप्रसिद्धी झाल्यामुळे मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित झाले होते. पण राहुल गांधी यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगून या कार्यक्रमाला येण्याचे टाळले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.