IPO This Week : चालू आठवड्यात फक्त एकच आयपीओ उघडणार, स्कोडा ट्यूब्ससह ९ कंपन्या होणार सूचीबद्ध
ET Marathi June 02, 2025 04:45 PM
मुंबई : आयपीओ बाजार 2 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात थंड असेल. कारण या आठवड्यात केवळ एक नवीन आयपीओ खुला होणार आहे. हा आयपीओ एसएमई विभागातील आहे. या व्यतिरिक्त आधीपासूनच उघडलेल्या आयपीओमध्येही गुंतवणूकीची संधी असेल. तसेच चालू आठवड्यात 9 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.



गंगा बाथ फिटिंग्ज आयपीओ (Ganga Bath Fittings IPO )

हा ३२.६५ कोटी रुपयांचा हा आयपीओ ४ जून रोजी उघडत आहे. यामध्ये ६ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओसाठी किंमत बँड ४६-४९ रुपये प्रति शेअर आहे. तर लाॅट आकार ३००० शेअर्सचा आहे. या आयपीओमध्ये ६६.६३ लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. शेअर्सचे वाटप ९ जून रोजी अंतिम केले जाऊ शकते. त्यानंतर ११ जून रोजी एनएसई एसएमईवर शेअर्स सूचीबद्ध केले जातील.





आधीच उघडलेला आयपीओ



३बी फिल्म्स आयपीओ ( 3B Films IPO)

हा आयपीओ ३० मे रोजी उघडला आहे आणि ३ जून रोजी बंद होईल. कंपनीला ३३.७५ कोटी रुपये उभारायचे आहेत. आयपीओमध्ये १५.९९ कोटी रुपयांच्या ३१.९८ लाख शेअर्सची विक्री ऑफर फाॅर सेलमध्ये केली जाईल. तर १७.७६ कोटी रुपयांचे ३५.५२ लाख नवीन शेअर्स विकले जातील. तुम्ही आयपीओमध्ये ५० रुपयांच्या किमतीत आणि ३००० च्या लॉटमध्ये बोली लावू शकता. वाटप ४ जून रोजी अंतिम केले जाऊ शकते. शेअर्सची लिस्टिंग ६ जून रोजी बीएसई एसएमईवर होऊ शकते.



सूचीबद्ध होणाऱ्या कंपन्या

नवीन आठवड्यात २ जून रोजी लीला हॉटेल्स आणि एजिस व्होपॅक टर्मिनल्सचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर पदार्पण करतील. तर ३ जून रोजी प्रोस्टार्म इन्फो सिस्टम्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होतील. त्याच दिवशी निकिता पेपर्स आणि ब्लू वॉटर लॉजिस्टिक्सचे शेअर्स एनएसई एसएमईवर सूचीबद्ध होतील. ३ जून रोजीच अ‍ॅस्टोना लॅब्स कंपनी बीएसई एसएमईवर पदार्पण करेल. स्कोडा ट्यूब्सचे शेअर्स ४ जून रोजी बीएसई, एनएसईवर सूचीबद्ध होतील. त्याच दिवशी एनआर वंदना टेक्सटाईल आणि नेपच्यून पेट्रोकेमिकल्स एनएसई एसएमईवर सूचीबद्ध होतील.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.