आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचे वेळापत्रक समोर आले आहे. माऊलींच्या पालखीचे आळंदीतून 19 जून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 18 जून रोजी प्रस्थान करणार आहे.
दिवसभर रेकी अन् रात्री महिलांची कपडे घालून चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटकदिवसभर रेकी करुन रात्री महिलेची कपडे घालून चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या हुशार चोराने मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली भागांमध्ये चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहेत.
सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात घुसून तोडफोडसांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. यात रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या. शिवाय रुग्णालयाचं मोठं नुकसान ही करण्यात आलं आहे. तोडफोडीनंतर वंचितकडून रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.
विशेष बैठकीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, 'महिला आयोगाला ताकद देण्याची गरज...'महिला आयोगाबाबतच्या विशेष बैठकीनंतर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला ताकद देण्याची गरज असून काही लुप होल आहेत, त्यावर काम करावं लागणार असल्याचं म्हटलं.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढएसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी(ता.जून) मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का?, अशी खोचक टिप्पणी केली.