Chandrapur News : व्हाट्सअप स्टेटस ठेवून युवकाने संपवले जीवन; ब्रम्हपूरीतील घटना
esakal June 02, 2025 04:45 PM

ब्रम्हपूरी : आपल्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप स्टेट्स वरती जीवन यात्रा संपवत असल्याचा मॅसेज लिहून रेल्वे रुळाखाली युवकाने आत्महत्या केली. ही घटना ब्रम्हपूरीपासून सुमारे दोन किमी अंतरावर रविवारी (ता.१) रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

अमोल वा़ंढरे (वय ३१ वर्ष) रा. वायगाव, ता. ब्रम्हपूरी असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवक हा वीज वितरण कंपनी अंतर्गत बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ म्हणून बोडेगाव-बेटाळा येथे कार्यरत होता.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपूरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वायगाव हे गाव आहे. मागील वर्षीच त्यांचे लग्न झाले असुन तो आपल्या पत्नी व आईवडीलासह राहत होता. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने तो घराबाहेर पडला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी त्यांनी अनेकांसोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.