डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं भारताला धक्का, 38 हजार कोटींच्या निर्यातीवर परिणाम होणार
Marathi June 01, 2025 04:25 AM

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अ‍ॅल्यूमिनिअमवरील आयातीवर लादण्यात आलेलं आयात शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्टनुसार भारताला 4.56 अब्ज डॉलर म्हणजेच 38000 कोटी रुपयांच्या धातू आणि स्टील निर्यातीवर संकट ओढावलं आहे.  

नेमकं काय प्रकरण?

डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 मे 2025 रोजी अमेरिकेत आयात होणाऱ्या अ‍ॅल्यूमिनिअम आणि स्टीलच्या आयातीवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन वाढून 50 टक्के करण्यात आलं आहे. हा नवा नियम 4 जून 2025 पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत घेतला आहे.  

भारतावर काय परिणाम होणार?

भारतानं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अमेरिकेला 4.56 अब्ज डॉलरच्या स्टील आणि अ‍ॅल्यूमिनिअमची निर्यात केली होती. यामध्ये 587.5 दशलक्षडॉलरच्या लोखंड आणि 3.1 अब्ज डॉलरच्या स्टीलची निर्यात, लोखंड आणि स्टीलपासून बनवलेल्या साहित्याची 860 दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली होती.  

आता अमेरिकेत यावर 50 टक्के टॅक्स लागेल तेव्हा भारतीय वस्तू महाग होतील. यामुळं भारतीय कंपन्यांना व्यावसायिक नुकसान सहन करावं लागू शकतं.  

भारतानं काय ठरवलं?

भारतानं या निर्णयाची माहिती जागतिक व्यापार संघटनेला दिलेली आहे. सरकारकडून आता प्रत्युत्तरसाठी पावलं उचलली जाऊ शकतात.  

GTRI च्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं ?

GTRI च्या मते या निर्णय फक्त व्यापार नाही तर पर्यावरणाला देखी नुकसान पोहोचवणारा ठरणार आहे. स्टील आणि अ‍ॅल्यूमिनिअमची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होतं. जगभरातील देशी ग्रीन टेक्नोलॉजीमध्ये गुंतवणूक करत असताना ट्रम्प यांना त्या निर्णयात पर्यावरणासंदर्भात कोणतीही चिंता वाटत नाही.  

डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण काय?

या क्षेत्रातील जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या आर्थिक राष्ट्रवाद म्हणजेच अमेरिका फर्स्ट धोरणाचा भाग आहे. यामुळं अमेरिकेत देशांतर्गत उद्योगाला फायदा मिळू शकतो. मात्र, हा जागतिक व्यापार आणि पर्यावरण संतुलनासाठी धोक्याचं संकेत ठरु शकतात.  

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/foreign-exchange-news- huge- huge-boost-to-de- Stresury-huge-increase-in-exechange-resvers-1361717">भारताच्या तिजोरीत मोठी भर, परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, पाकिस्तानकडे किती साठा?
& nbsp;
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/business/rule-change-From-1st-june-2025-from-lpg-cylinder-to-cred- card- adhar-card-epfact-Will-bee-on-everyone-1361560">Rule Change: LPG, क्रेडिट कार्ड ते आधार कार्ड अपडेट,  1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, जाणून घ्या अपडेट 
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.