MI vs GT Eliminator: ३ घरी परतले, २ जखमी झाले! Mumbai Indians चे टेंशन वाढले; प्लेइंग इलेव्हनमध्ये करावे लागतील बदल, रोहित शर्मा...
esakal May 31, 2025 12:45 AM

MI vs GT Eliminator Playing XI, Head to Head Records: ने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये जबरदस्त पुनरागमन करताना प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. गुजरात टायटन्सविरुद्ध आज त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे आणि या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू निवडताना MI ची दमछाक होणार आहे. कारण, त्यांचे तीन प्रमुख खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी माघारी परतले आहेत. त्यात आणखी दोन खेळाडू जखमी असल्याचे दिसले आहे. त्यामुळे पाच खेळाडूंनी मुंबईची डोकेदुखी वाढवली आहे.

मुंबई इंडियन्सकडे स्टार खेळाडूंचा भरणा आहे, परंतु सर्वांनाच आपली छाप सोडता आलेली नाही. सूर्यकुमार यादव हा या पर्वात मुंबईसाठी सर्वाधिक ६४० धावा करणारा फलंदाज आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ३८८ धावा करणारा रायन रिकेल्टन आहे, परंतु तो प्ले ऑफच्या लढतीत खेळणार नाही. राष्ट्रीय कर्तव्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू मायदेशी परतला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा ( ३२९) येतो.

विल जॅक्सने १३ सामन्यांत २३३ धावा व ६ विकेट्स घेतल्या आहेत. पण, तोही इंग्लंडच्या संघाचा सदस्य असल्याने मायदेशी परतला आहे. कॉर्बिन बॉश हा माघारी परतलेला तिसरा खेळाडू आहे. त्याने ३ सामन्यांत ४७ धावा व १ विकेट घेतली आहे. या तिघांच्या जागी संघात , रिचर्ड ग्लीसन व चरिथ असलंका यांनी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत आज सलामीला इंग्लंडचा आक्रमक फलंदाज बेअरस्टो येण्याची शक्यता बळावली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी या पर्वात २७४ धावा करणारा तिलक वर्मा काल डाव्या पायाच्या गुडघ्याला पट्टी बांधून चालताना पाहायला मिळाला आणि गोलंदाज दीपक चहरही लंगडताना दिसला. त्याच्या नावावर ११ विकेट्स आहेत. त्यामुळे या दोघांच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे. मुंबईला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार हे निश्चित आहे.

मुंबई-गुजरात यांच्यात आतापर्यंत ७ लढती झाल्या आणि त्यापैकी ५ शुभमन गिलच्या संघाने जिंकल्या. मुंबईला फक्त दोन विजय मिळवता आले आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार तिलक व चहर यांची दुखापत गंभीर नाही आणि त्यामुळे ते आज खेळू शकतील.

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, चरिथ असलंका/ बेव्हॉन जेकब्स, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.