Chitra Wagh: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद सदस्या चित्रा वाघ यांनी “अहिल्याईचा उदो उदो” या विशेष व्हिडीओ सिरिजची सुरुवात केली आहे. २० मे २०२५ पासून ही मालिका त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर दररोज प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू नव्याने जाणून घेण्याची संधी मिळत आहे.
या व्हिडीओ मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वावर, समाजकारणातल्या त्यांच्या भुमिकेवर, तसेच स्त्रीशक्ती, प्रशासनिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यशैलीचा आजच्या काळातील संदर्भात घेतलेला आढावा ही मालिकेची जमेची बाजू आहे.
या व्हिडीओ मालिकेमुळे नव्या पिढीला इतिहासातील एका सशक्त स्त्रीने घडवलेल्या परिवर्तनाचे महत्त्व समजण्यास मदत होत आहे. महिलांना प्रेरणा देणारी ही सिरिज केवळ माहितीपर नसून, जनजागृतीसाठीही उपयुक्त ठरत आहे.
या व्हिडीओ मालिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच यांच्या कथा सांगण्याचे कौशल्याचे नेटकरी कौतुक करत अहिल्या , अप्रतिम अशा कमेंट करत आहेत.