Live Updates : वैष्णवीची सासू आणि नणंदेचे मोबाइल निलेश चव्हाणने तिजोरीत लपवले
Marathi May 31, 2025 10:26 PM


वैष्णवीची सासू आणि नणंदेचे मोबाइल निलेश चव्हाणने तिजोरीत लपवले

पोलीस निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी पोहचले

31/5/2025 17:58:51


पुण्यात कामगार नोंदणीत मोठा भ्रष्टाचार समोर

1 रुपये नोंदणी फी असताना खासगी एजंटच्या माध्यमातून हजार रुपये आकारले जात असल्याचा प्रकार

31/5/2025 16:6:2


डोंबिवलीत शिवसेना उबाठा आणि मनसेचं एकत्र आंदोलन

पलावा पुलाच्या कामासंदर्भात एकत्र आंदोलन

31/5/2025 16:1:51


राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या पोलीस कोठडीत वाढ

हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाणची चौकशी समोरासमोर होणार

31/5/2025 15:44:7


ज्ञानमूर्ती शर्मा यांची उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड

निरज उभारे यांची दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड

शलाका साळवी यांची दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड

31/5/2025 15:17:22


उत्तर प्रदेशातील आमदार अब्बास अन्सारी यांना दोन वर्षांची शिक्षा

न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने अब्बास अन्सारी यांची आमदारकी धोक्यात

31/5/2025 15:1:4


अहिल्यादेवींचं दर्शन घेण्यासाठी लवकरच पंतप्रधान मोदी येतील – देवेंद्र फडणवीस

चौंडी हे एक प्रेरणास्थान आणि ऊर्जा स्थान आहे

अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवामित्त चौंडीत विविध कार्यक्रमाचं आयोजन

31/5/2025 15:0:31


उत्तर प्रदेशातील आमदार अब्बास अन्सारी यांना न्यायालयाचा दणका

हेट-स्पीच प्रकरणी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे आमदार अब्बास अन्सारी दोषी

अब्बास अन्सारींसह भाऊ ओमर अन्सारी आणि मन्सूर अन्सारी हेही दोषी

सीजेएम न्यायालय लवकरच ठोठावणार तिघांना शिक्षा

31/5/2025 13:6:34


डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे गट कार्यकर्ते एकत्र

पलावा पुलाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आंदोलन

31/5/2025 12:6:10


मुंबईतील सहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

दत्ता नलावडे पुन्हा परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त

नवनाथ ढवळे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नवे पोलीस उपायुक्त

31/5/2025 11:1:47


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याचा निलेशवर आरोप

फरार निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी केली होती अटक

31/5/2025 10:58:32


मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल

31/5/2025 10:13:18


लालबाग, परळ, करी रोड परिसरातील वीजपुरवठा खंडित

गेल्या तीन-चार तासांपासून बेस्टचा वीजपुरवठा बंद

फेज डाऊन झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम

बेस्टकडून युद्धपातळीवर दुरुस्तीकाम सुरू

31/5/2025 9:47:18


ठाणे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी

मानपाडा पुलाजवळ ट्रक दुभाजकाला धडकला

सुदैवाने जीवित हानी नाही, ट्रकचालक फरार

31/5/2025 9:41:59


पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 36 तासांचा पॉवर ब्लॉक

आज-उद्या पश्चिम रेल्वेच्या 162 फेऱ्या रद्द

कांदिवली-बोरीवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक

आज दुपारी 2 वाजल्यापासून उद्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक

31/5/2025 7:54:39



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.