लाडकी बहीण योजनेविषयी अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, इथून पुढे फक्त….
Marathi June 02, 2025 12:28 PM

लाडकी बहिणी योजनेवरील अजित पवार: लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचं होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त  गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल,  असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी प्रसारमध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पुणे शहरामध्ये अशाप्रकारे कोणकोणाला शस्त्र परवाना देण्यात आला आहे, हे तपासले जाईल. मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपींनी फेरआढावा घेतला. अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. 2020 ते 2023 कोणाकोणाला लायसन्स दिली गेली, याचा तपास करु. त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. ज्यांना गरज असेल त्यांचेच शस्त्र परवाने ठेवू. लायसन्स देण्याचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच निलेश चव्हाण हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला पकडून रिमांड मिळवला आहे. आता त्याची चौकशी होऊ दे. त्याच्या घरातील लॅपटॉप, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आता पोलिसांना तपास करु दे, त्यामधून कोणत्या गोष्टी बाहेर येतील, ते बघू, असे अजित पवार यांनी म्हटले.

Jayant Patil & Ajit Pawar: अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का,  पवार काका पुतण्याचं मनोमीलन होणार का असे सवाल विचारले जात असतानाच रविवारी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पुण्यात वसंतदादा साखर संकुलात एकत्र आले होते. बैठकीत दोन्ही नेते शेजारी शेजारी बसले होते. मात्र साखर संकुलाची बैठक आटोपल्यावर शरद पवार- अजित पवार आणि जयंत पाटील यांची आणखी एक बैठक झाली. या बैठकीला बंद दाराआड हे तिघे नेतेच उपस्थित होते.(( दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा सर्वस्वी सुप्रिया सुळेंवर सोपवला होता. त्यानंतर कालच पवारांनी याचसंदर्भातल्या प्रश्नावर माहिती नाही असं उत्तर दिलं होतं…))  काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पवार काका पुतणे शेजारी शेजारी बसून अगदी व्यासपीठावर एकमेकांशी बोलतही होते… त्यामुळे आता  झालेल्या बंद दाराआडच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता आहे. दरम्यान पुण्यात ९ तारखेला पुढची साखर संकुलाची बैठक होणार आहे. त्या बैठकीलाही काका पुतण्या एकत्र येणार आहेत. दरम्यान आमची बंद दाराआड चर्चा  किंवा कुठलीही बैठकही झाली नाही असं स्पष्टकरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

https://www.youtube.com/watch?v=CG9LA6OYERW

आणखी वाचा

घरी जास्त दाब टाकला तर सांगायचं, मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, पंकजा मुंडे जालन्यात म्हणाल्या, कोणी पैसे काढून घेत नाही ना? मला सांगा..

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.