Mumbai Indians Qualifier 2 Performance: (30 जून) रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या एलिमीनेटर सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2025च्या क्वालिफायर-2 सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. (Mumbai Indians Qualifier 2) मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 228 धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकात 208 धावाच करू शकला.
आता मुंबई इंडियन्सचा संघ (1 जून) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्जशी (PBKS) भिडणार आहे. यावेळी आपण मुंबई इंडियन्सची आयपीएल इतिहासातील क्वालिफायर-2 मधील कामगिरी कशी राहिली आहे, त्यावर नजर टाकूया.
आयपीएलमध्ये 2011च्या हंगामापासून प्लेऑफ सामन्यांची सुरुवात झाली, त्यानंतर आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 4 वेळा क्वालिफायर-2 चा सामना खेळला आहे, ज्यात त्यांचा रेकाॅर्ड 50-50 असा राहिला आहे. मुंबईने 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 2 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, एक आकडेवारी मुंबई इंडियन्सच्या बाजूने जाते ती म्हणजे, जेव्हा 2 वेळा मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 सामना जिंकला आहे, तेव्हा त्या हंगामात संघाने ट्रॉफीही जिंकली आहे. (Qualifier 2 Record)
2011च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा क्वालिफायर-2 सामना खेळला होता, ज्यात त्यांना आरसीबी संघाकडून 43 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2013च्या हंगामात मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 सामना खेळला, ज्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सला 4 विकेट्सने हरवले आणि त्यानंतर फायनल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला 23 धावांनी पराभूत करून ट्रॉफी जिंकली. 2017च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाला 6 विकेट्सने मात दिली आणि त्यानंतर फायनल सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सला एका धावेने हरवून विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने शेवटचा 2023च्या आयपीएल हंगामात क्वालिफायर-2 सामना खेळला होता, ज्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. (मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2)
क्वालिफायर-2 मध्ये, मुंबई इंडियन्स संघ पंजाब किंग्जशी सामना करेल, ज्यांच्याविरुद्ध त्यांना आतापर्यंत कठीण स्पर्धा मिळाली आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने पंजाबविरुद्ध 33 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना 17 सामने जिंकण्यात यश आले आहे, तर 16 सामने गमावले आहेत. आयपीएल 2025च्या हंगामातही, मुंबई इंडियन्स संघाला लीग टप्प्यात पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्सने एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. (Mumbai Indians vs Punjab Kings Qualifier 2)