ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार चळवळीतील नेते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांच्या पुण्यातील निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Supriya Sule News : परीक्षेची संधी द्यावीपुण्यात भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुळे यांनी केली आहे.
CBI Action : लाचप्रकरणी महसूल अधिकाऱ्याला अटकदिल्लीत सीबीआयकडून केंद्राच्या महसूल विभागातील अतिरिक्त महासंचालकांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमित कुमार सिंघल असे या अधिकाऱ्याचे नाव असून तब्बल २५ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात ते अडकले आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे टॅक्ससंदर्भातील कामांबाबत ४५ लाख रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
रॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन निवासी डॉक्टर निलंबितरॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. सहा महिन्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथअजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडमधील सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी NDPP पक्षात सामील झाले. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यीय विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले. या विलयानंतर, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) च्या आमदारांची संख्या 25 वरून 32 वर पोहोचली आहे.
शंकर देशमुख बीडचे नवे भाजप जिल्हाध्यक्षपुर्वी कॉंग्रेस, मागच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष. या पक्षातून आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद ही भाजपध्ये जणू परंपराच पडली होती. मात्र, २२ वर्षांनंतर भाजपने या परंपरेला छेद देत मुळ पक्षातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली.
पुणे पोलिसांचा मनमानी, मॅरेथॉनसाठी शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनमधील रस्ते बंदपुण्यातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनरस्ते पहाटे चारपासून पोलिसांनी बंद केल्याने पुणेकरांचे हाल झाले. वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेसाठी हे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्याने परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. काही जणांनची प्लाईट देखील मीस झाली. पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता नागरिकांना थांबवून ठेवत दहाच्यानंतर रस्ते सुरू होतील, असे पोलिस सांगत होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.