रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेलं नाही. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहेत. आताही युक्रेनने रशियावर जोरदार ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ओलेन्या, बेलाया या हवाई तळांना लक्ष करण्यात आले आहे. ज्यात 4 एअर बेस ध्वस्त केल्याने 40 विमानांचं नुकसान झालं आहे.
Nitesh Rane News : 'फक्त एकच कारण' अन् मंत्री नितेश राणे यांच्यासह 30 जणांची निर्दोष मुक्ततासिंधुदुर्गातील मत्सव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या केबिनमध्ये 2017 मध्ये आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्तांच्या टेबलावर मासे फेकण्यात आले होते. याप्रकरणी 30 जणांसह सध्याचे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता राणे यांच्यासह 30 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींपैकी मासे कुणी फेकले हे पाहिले नसल्याच्या मुद्द्यावर त्यांची मुक्तता झाली आहे.
MNS-Shivsena News : ठाकरे गटानेच्या दिव्यातील बॅनरबाजीमुळे राजकारण पुन्हा तापलं? नेमंका विषय काय?स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्याचपार्श्वभूमिवर दिव्यात ठाकरे गटाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune hagawane case News : हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन पोलिसांकडून जप्तशशांक आणि लता हगवणे यांनी जेसीबी विक्री व्यवहारात प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी येळवंडे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून महाळुंगे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शशांक आणि लता हगवणे यांचे विरोधात फसवणुकीचा दाखल असलेल्या गुन्ह्यावरून हागवणे कुटुंबीयांच्या जेसीबी मशीन जप्त करण्यात आले आहे.
Pune Car Accident :पुण्यातील भावे हायस्कूलजवळील अपघात प्रकरणी तिघांना अटकपुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळील अपघात प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कारचालक जयराम मुळे, त्याचा सहकारी राहुल गोसावी आणि कारमालक दिगंबर शिंदे अशी तिघांची नावे आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी एका कॅन्टीनसमोर चहा पित थांबलेला असताना कारचालकाने बारा जणांना ठोकारले होते. त्यात तिघांची प्रकृती गंभीर आहे.
Devendra Fadnavis : पालकमंत्रिपदाबाबत काहीही काळजी करू नका : देवेंद्र फडणवीसपालकमंत्री आणि कुंभमेळ्याचा काय संबंध आहे. पालकमंत्री जातात, राहतात, येतात. पण त्यांच्याशिवाय काय अडलं आहे का. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत काहीही काळजी करू नका. कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील. गिरीशभाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात. दादा भुसे, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ आहेत आणि कमी पडलो तर आम्हीही आहोत. त्यामुळे तुम्ही पालकमंत्रिपदाची काळजी करू नका. कुंभमेळा हे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व आहे.
Sanjay Raut : महाराष्ट्रात शिवसेना हा एकच प्रबळ विरोधी पक्ष : संजय राऊतदेशात लोकशाहीचा तमाशा चालला आहे. संविधानाची दररोज हत्या होताना दिसत असताना महाराष्ट्रात शिवसेना हा एकच पक्ष प्रबळ विरोधी पक्ष आहे. जनतेने आमच्यावर जी आज विरोधी पक्षाची जबाबदारी दिली आहे. ती आम्ही पूर्ण करू. जोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षात आहात, तोपर्यत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडा. आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे. आम्ही सत्तेवर फार कमी वेळ होतो, पण आमची संघटना सत्ताधाऱ्यांना कायम भारी पडली आहे. ती आमची ताकद आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखा जाहीरनाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ता. ३१ आक्टोंबर २०२६ पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तो २४ जुलै २०२८ पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे. या कुंभमेळ्यात ४५ ते ४६ अमृतस्नान असणार आहे. कुंभमेळा आणि शाहीस्नानाच्या तारखा निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात ह्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
Ajit Pawar : माणिकराव कोकाटेंना अजून त्या गोष्टींची सवय नाही : अजित पवारसगळ्याच गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? काही गोष्टी मनात देखील ठेवायच्या असतात. माणिकराव कोकाटे यांना अजून मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे असं होत आहे. हे वक्तव्य फार महागात पडतं. मला ते फार जास्त महागात पडतं, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर केले.
Ajit Pawar : केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळतोअचानक आलेल्या पावसामुळे जे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबतचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे झाल्यानंतर त्याबाबतचा योग्य तो मोबदला देण्याची कारवाई सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्वीच तरतूद करण्यात आली असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अशा परिस्थितीमध्ये निधी मिळतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.
Pimpri Police : पिंपरी पोलिसांकडून महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्यानंतर तपास सुरुपुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यनंतर तिच्या लहान बाळाची हेळसांड करून आई-वडिलांना धमकावल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून आरोपी निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी निलेशच्या घराची झाडाझडती घेतली असता यामध्ये पोलिसांना तपासासाठी हव्या असलेल्या काही वस्तू घरी आढळून आल्या आहेत. त्यानंतर रविवारी पोलिसांनी निलेश चव्हाणसह राजेंद्र हगवणे व त्यांच्या पुत्राची एकत्रित चौकशी केली.
Nashik : सुरक्षिततेसाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये कुंभमेळा बैठकीला सुरुवातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक सुरु झाली आहे. विविध आखाड्यांचे साधू महंत हेही बैठकीला उपस्थित आहे. या बैठकीत शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक येथे होणाऱ्या आगामी २०२६-२७ कुंभमेळा नियोजनचा आढावा घेणार आहेत. १३ आखाड्यांच्या साधू महंतांच्या उपस्थितीत शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर करण्यात येणार आहेत.
CM Devendra Fadnavis in Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकमध्ये आगमनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकच्या ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ग्रंथ देवून स्वागत केले. यावेळी आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी उपस्थित होते.
Nashik News : नाशिकमध्ये कॉलेजच्या प्राचार्याकडून विद्यार्थींनींचा विनयभंगनाशिकमधील नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रवीण घोलप असे आरोपी प्राचार्याचे नाव आहे. प्राचार्य विरोधात भद्राकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Sharad Pawar News : बाबा आढाव यांना शुभेच्छा...ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार चळवळीतील नेते बाबा आढाव यांचा आज वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांच्या पुण्यातील निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Supriya Sule News : परीक्षेची संधी द्यावीपुण्यात भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातात एमपीएससी करणारे तरुण जखमी झाले आहेत. याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. या विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना कदाचित आजचा पेपर देता येणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी प्रदान करणे आवश्यक आहे. यासोबतच शासनाने या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च करावा जेणेकरून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुळे यांनी केली आहे.
CBI Action : लाचप्रकरणी महसूल अधिकाऱ्याला अटकदिल्लीत सीबीआयकडून केंद्राच्या महसूल विभागातील अतिरिक्त महासंचालकांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमित कुमार सिंघल असे या अधिकाऱ्याचे नाव असून तब्बल २५ लाखांची लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात ते अडकले आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे टॅक्ससंदर्भातील कामांबाबत ४५ लाख रुपयांची लाच मागितली होती. पैसे न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
रॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन निवासी डॉक्टर निलंबितरॅगिंग प्रकरणात बी.जे.मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. सहा महिन्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथअजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडमधील सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी NDPP पक्षात सामील झाले. त्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यीय विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले. या विलयानंतर, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) च्या आमदारांची संख्या 25 वरून 32 वर पोहोचली आहे.
शंकर देशमुख बीडचे नवे भाजप जिल्हाध्यक्षपुर्वी कॉंग्रेस, मागच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष. या पक्षातून आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद ही भाजपध्ये जणू परंपराच पडली होती. मात्र, २२ वर्षांनंतर भाजपने या परंपरेला छेद देत मुळ पक्षातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली.
पुणे पोलिसांचा मनमानी, मॅरेथॉनसाठी शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनमधील रस्ते बंदपुण्यातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, बावधनरस्ते पहाटे चारपासून पोलिसांनी बंद केल्याने पुणेकरांचे हाल झाले. वृक्षाथॉन या मॅरेथॉन स्पर्धेसाठी हे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्याने परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. काही जणांनची प्लाईट देखील मीस झाली. पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता नागरिकांना थांबवून ठेवत दहाच्यानंतर रस्ते सुरू होतील, असे पोलिस सांगत होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.