Leopard attack; child dies
Marathi June 02, 2025 10:35 PM


बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आजोबांसोबत फिरण्यास गेलेल्या पाच वर्षीय नातवाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिंडोरी येथे शनिवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. रुद्र अमोल जाधव असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. (Leopard attack; child dies)

दिंडोरी शहरालगत जाधव वस्ती आहे. शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रुद्र अमोल जाधव हा दत्तु जाधव यांच्याबरोबर घरालगतच्या परिसरात फिरावयास गेला. त्यावेळी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने आजोबांच्या डोळ्यादेखत झडप घालून रुद्र यास ओढत नेले. या घटनेने आजोबा सुन्न झाले. त्यांनी स्वत:ला कसेबसे सावरले व मदतीसाठी याचना केली. आजोबांच्या आवाजाने परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व जीव धोक्यात घालून रुद्रची सुटका केली. गंभीर जखमी झालेल्या रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करत रुद्रला मृत घोषित केले. रुद्रचे संतप्त नातेवाईक व नागरिकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय व वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

महिनाभरात दुसरा बळी
मे महिनाभरात बिबट्याने दोन बळी घेतले. काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर वाढल्याचे निदर्शनास आले आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.