आधार कार्ड मोफत अपडेटसाठी शेवटचे काही दिवस शिल्लक, मुदत संपल्यानंतर किती शुल्क भरावं लागणार?
Marathi June 02, 2025 11:33 PM

विनामूल्य आधार कार्ड अद्यतन नवी दिल्ली : आधार कार्डमधील माहिती मोफत अपडेट करायची असल्यास केवळ 12 दिवस राहिले आहेत. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत आहे. आधार कार्ड धारकाला त्याच्या ओळखीसंदर्भात आणि पत्ता या संदर्भातील माहिती मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं या संदर्भातील माहिती दिलेली आहे. 14 जूननंतर कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी आधार नोंदणी केंद्रावर भेट देऊन 50 रुपये शुल्क द्यावं लागेल.

यूआयडीएआयच्या नियमानुसार आधार कार्ड धाकराला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आधार नोंदणीच्या 10 वर्षानंतर अपडेट करणं आवश्यक आहे. आधार रेकॉर्ड अपडेट ठेवण्यासाठी ही पूर्तता करणं आवश्यक आहे.

मोफत आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसं करायचं?

1. यूआयडीएआयच्या वेबसाईटला भेट देऊन माय आधार पोर्टलवर जा.
2. तुमच्या 12 अंकी आधार क्रमांकासह आणि कॅप्चा कोड नोंदवा.
3. तुम्हाला  आधार कार्डशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल त्याद्वारे पडताळणी करा.
4.लॉगीन केल्यानंतर तुमच्या तिथं उपलब्ध असलेला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा पाहा.
5. जर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करायची असल्यास डॉक्युमेंट अपडेट पर्यायवर क्लिक करा.
6. तुम्हाला जे कागदपत्रं अपडेट करायचं आहे त्याची निवड करुन स्पष्ट दिसणाऱ्या कागदपत्राला अपलोड करा.
7. तुम्ही अपलोड करत असलेली फाईल जेपीईजी, पीएनजी, पीडीएफ फॉरमॅटमध्ये असावी. ती फाईल 2 एमबी पेक्षा मोठी नसावी.
8.तुमची माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या, त्यानंतर सबमिट अपडेट रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करा. यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर नोंदवून ठेवा, पुढील अपडेटसाठ त्याचा फायदा होईल.

कोणती कागदपत्रं जमा करावी लागणार?

ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रं : रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शासनानं कडून देण्यात आलेलं ओळखपत्र, भारताचा पासपोर्ट

ओळखीचा पुरावा कागदपत्रं : पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, शाळेचं गुणपत्रक, फोटो असलेला शाळा सोडल्याचा दाखला, शासनांचं पत्ता नसलेलं ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा कागदपत्रं : अलीकडच्या काळातील वीज बील, पाणी किंवा गॅस बिल (गेल्या तीन महिन्यातील)  बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, भाडेकरार

कागदपत्रं कशी अपडेट करायची आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये असावीत?

कागदपत्रं ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करावी लागतील, माय आधार पोर्टल किंवा आधार केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून अपडेट करावं लागेल.

जेपीईजी, पीएनजी आणि पीडीएफ या प्रकारात फाईल अपलोड करता येतील. याची साईज 2 एमबी पेक्षा कमी असावी.

फोटो, बोटांचे ठसे यासह इतर बायोमेट्रिक अपडेसाठी आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.

14 जूननंतर सर्व प्रकारच्या कागदपत्रांच्या अपडेटसाठी ऑफलाईन पद्धतीनं आधार नोंदणी केंद्रावरुन ती कामं करावी लागतील. यासाठी शुल्क आकारलं जाईल. त्यापूर्वी आधार कार्ड संदर्भातील डिटेल्स अपडेट करुन घ्याव्यात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.