चेहऱ्यावर एक लहानसा मुरुमही दिसला तरी महिलांना अनेकदा काळजी वाटू लागते. अशा परिस्थितीत, जर डोळ्यांखाली काळी वर्तुळे वाढत असतील आणि त्यामुळे तुमचे सौंदर्य कमी होत असेल, तर आता मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण काही घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करू शकता. जाणून घेऊयात काही सोपे घरगुती उपाय.
सौंदर्य तज्ञांच्या मते, काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी करू होऊ शकते. ज्यामुळे बहुतेक महिला चिंतेत असतात. जर तुमच्याही चेहऱ्यावरील काळी वर्तुळे वाढत असतील आणि ती चेहऱ्यावर ठळकपणे दिसत असतील, तर आता तुम्ही कोरफडीचा वापर करून घरी एक खास पेस्ट तयार करू शकता. ते बनवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर आणि बटाट्याचा रस लागेल.
घरी पेस्ट तयार करण्यासाठी, एका कंटेनरमध्ये ताजे कोरफडीचे जेल काढून घ्या . आता त्यात बटाट्याचा रस मिसळा. बटाट्याचा रस बनवण्यासाठी, बटाटा मिक्सरमध्ये बारीक करा आणि किसून घ्या, नंतर त्यातील पाणी वेगळे करा, आता या दोन्ही गोष्टी चांगल्या एकत्र मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली लावा. रात्री झोपण्यापूर्वी दररोज हे करा.
डोळ्यांखाली ही पेस्ट लावण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पेस्ट लावताना ती तुमच्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून, डोळ्यांची नीट काळजी घेऊन केवळ काळी वर्तुळे असलेल्या भागावर ही पेस्ट लावा.
हेही वाचा : Polka Dot Dress : ऑफिसवेयर्ससाठी ट्रेंडी पोलका डॉट ड्रेस डिझाइन्स
संपादित – तनवी गुडे