नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असले तरी संधी अगणित - प्रा. पी. बी. घेवारी
esakal June 03, 2025 12:45 AM

11823
वाठार : येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आयोजित मॉक एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशस्वी स्पर्धकाचा सत्कार करताना उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी. शेजारी डॉ. एस. जी. चोंदे, डॉ. जे. एम. शिंदे, डॉ. ए. ए. सूर्यवंशी, प्रा. व्ही. व्ही.गोंदकर.


माने इन्स्टिट्यूटमध्ये
पारितोषिक वितरण

घुणकी, ता.२ ः विद्यार्थ्यांनो, सध्याचे युग स्पर्धेचे आहे, वेगाने होणारे तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करायचे असेल, तर अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नोकऱ्यांचे स्वरूप बदलत असले, तरी संधी अगणित आहेत.‘ असे मत उपप्राचार्य पी. बी. घेवारी यांनी वाठार (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले. वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘मॉक एमएचटी-सीईटी‘ परीक्षेचे आयोजन केले होते. विजेत्यांना पारितोषिक वितरण प्रा. घेवारी, डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. जे. एम. शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रा. गणेश लोळगे यांनी स्वागत केले. डॉ. ए. ए. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. २५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान २१ सत्रांत झालेल्या परीक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील १७३८ विद्यार्थी सहभागी झाले. यातील ७४ विजेत्यांना पारितोषिके दिले. डॉ. एस. जी. चोंदे यांनी आभार मानले. विजेत्यांची नावे अशी- तनिष्का घेवारी, शुभम सुतार, अनिकेत पाटील, गौरी तळपे, गंधर्व कांबळे, श्रेयन लाटकर, महंमद मुजावर, सिद्धी पाटील, ब्रायन फ्रॅन्चिसविलियम दास, प्रणव पाटील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.