गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
esakal June 03, 2025 12:45 AM

पुणे, ता. २ : सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ६, ७ व ८ जूनला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

राजकीय नेतृत्व विकास कार्यशाळा
आज अनेक युवक राजकारणात सक्रिय होत आहेत, मात्र नेतृत्व कौशल्य व राजकीय समज नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. ही गरज ओळखून राजकीय नेतृत्व विकास या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन ७ व ८ जूनला केले आहे. कार्यशाळेत मतदारसंघ विश्लेषण, सर्व्हे, प्रचार योजना, टीम उभारणी, जनसंपर्क, मीडिया हाताळणी, वॉर रूम व्यवस्थापन आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या किंवा आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. अनुभवी राजकीय विश्लेषक, निवडणूक शास्त्रज्ञ व प्रचारकांचे मार्गदर्शन लाभणार असून, ही संधी दीर्घकालीन राजकीय यशासाठी महत्त्वाची ठरू शकते.
संपर्क : ८४८४८११५४४

औषधी वनस्पती लागवड कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा ९ जूनपासून आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लास्टिक इ.विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी भांडवल इ.विषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ९ जूनपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट अप करायचे आहे तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.