Ranjit Kasle : बडतर्फ पोलीस अधिकारी रंजित कासले यांच्यावर बीडमध्ये आणखी एक गुन्हा
esakal June 04, 2025 07:45 PM

बीड : बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांच्या विरोधात आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुन्हा नोंद झाला आहे. बीड जिल्ह्यात कासलेवर दाखल झालेला हा सातवा गुन्हा आहे. यापूर्वी ॲट्रॉसिटी, फसवणूक, बदनामी असे त्याच्यावर गुन्हे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन केल्यामुळे फडणवीस समर्थकांच्या भावना दुखावल्याचा आरोप रंजित कासलेंवर करण्यात आला आहे. बीड येथील भाजपचे युवक पदाधिकारी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक संभाजी सुर्वे यांनी यासंबंधीत तक्रार बीडच्या सायबर ठाण्यात दाखल केली होती त्यावरून हा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीत म्हटले की, बडतर्फ पोलिस कर्मचारी रणजित कासले याने गेल्या काही िदवसात सातत्याने विविध पदावरील मान्यवर व्यक्तींसंदर्भात बेजबाबदार िवधाने केली आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उद्देशून आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र भराटे यांना तुम्ही आतमध्ये ठेवलंय. तो जेलमध्ये माझ्यासोबतच होता. त्याने मला सगळं काही सांगितलं आहे. दहा अकरा खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत तुम्ही त्याच्यावरती.

हे आणि अशा प्रकारचे अनेक आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य केल्याने फडणवीस यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून सायबर ठाणे बीड येथे आरोपी रणजित कासले याच्यावर गुन्हा नोंद झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.