चापेकर चौकालगत रस्त्याची दुरुस्ती
esakal June 03, 2025 12:45 AM

चिंचवड, ता.२ ः चिंचवडमधून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चापेकर चौकालगत खराब झालेल्या रस्त्याची महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाकडून दुरुस्ती करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण व रस्ता दुरुस्तीचे काम पहिल्याच पावसात उद्ध्वस्त झाले होते. चौकापासून काही अंतरावर रस्ता खचून मोठा खड्डा पडला होता. त्याबाबत ‘दुरुस्त केलेला रस्ता दोन महिन्यांतच उखडला’ हे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत वरील दुरुस्ती करण्यात आली.
उपअभियंता बाळासाहेब शेटे (स्थापत्य) यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून खड्डा पडला होता. त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविले. त्यामुळे वाहन चालक, बस चालक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

CWD25A01190

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.