गड- दोन कॉलम संक्षिप्त
esakal June 03, 2025 01:45 AM

67566
बसर्गे : येथे व्ही. एस. मुंगूरवाडी यांचा सत्कार केदार नाडगोंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी डी. बी. कटकोळी, आर. बी. टेळे आदी उपस्थित होते.

बसर्गेमध्ये मंगूरवाडी यांचा सत्कार
नूल, ता. १ ः बसर्गे एज्युकेशन सोसायटी, नाडगोंडे परिवार व एस. एम. हायस्कूलतर्फे व्ही. एस. मुगूंरवाडी यांचा सत्कार संस्थेचे संचालक केदार नाडगोंडे-सरकार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. माजी मुख्याध्यापक मुंगूरवाडी यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविले आहे. त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव आर. बी. टेळे, ज्येष्ठ संचालक डी. बी. कटकोळी, मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.