Shinde’s minister is upset with Ajit Pawar, complains about not providing funds
Marathi June 04, 2025 06:26 PM


शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलेले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली.

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलेले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत सविस्तर चर्चा केली. प्रत्येक खात्याचा आढावा घेतला असता शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार निधी देत नसल्याची उघड नाराजी एकनाथ शिंदे यांच्यासमोर बोलून दाखवली आहे.(Ajit Pawar: Shinde’s minister is upset with Ajit Pawar, complains about not providing funds)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलावलेल्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी निधी रोखल्याचा आरोप केला. “सरकारमधील सर्व मंत्र्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. जर अजित पवार निधी सोडत नसतील, तर आम्ही आमचे काम कसे पार पाडणार?” असा सवाल उपस्थित केला. या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यांनंतर तक्रारींवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना आश्वासन दिले की, ते स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण सोडवतील.

निधी वाटपाचा अंतिम निर्णय माझा नाही : अजित पवार

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना मंत्र्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. अर्थमंत्री असतानाही निधी वितरणाचा अंतिम निर्णय हा त्यांचा एकट्याचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निधी वाटपासंदर्भातील अंतिम मान्यता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मिळते, असं अजित पवार यांनी सांगितले. मंगळवारी रात्री देवगिरी निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मागील बैठकीचा संदर्भ देताना त्यांनी सांगितलं की, निधी वितरित केला जाईल, मात्र त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता आवश्यक असेल.


हेही वाचा…Sanjay Shirsat : ठाकरेंचा सांगलीतील वस्ताद शिंदेंच्या गोटात; हिंमत असेल तर हा प्रवेश थांबवा, शिरसाटांचे आव्हान



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.