Mumbai Crime – RCity Mall मध्ये आलेल्या व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल, तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत संपवले जीवन
Marathi June 03, 2025 02:25 PM

मुंबईच्या घाटकोपर परिसरातील R CITY मॉलमध्ये सोमवारी धक्कादायक घटना घडली. येथे एका 38 वर्षाच्या व्यक्तीने मॉलच्या तिसऱ्या मजल्य़ावरून उडी मारून आपले जीवन संपवले. दीपक जोशी (वय 38) असे या व्यक्तीचे नाव होते. या घटनेनंतर पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि दीपकचा मृतदेह ताब्यात घेतला.सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा सुरु आहे.

मिड डे या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. R City मॉलच्या तळमजल्यावर अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे मॉल मधील ग्राहक तसेच दुकानदार तातडीने मॉलच्या लॉबीमध्ये पोहोचले. यावेळी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्या व्यक्तीचं डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु होता. यामुळे दुकानदार आणि मॉलमधील ग्राहक प्रचंड घाबरले. यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली.

बनावट नोटा छापल्याप्रकरणी दीपकला झाली होती अटक

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जोशी हा कामा लेनमधील बारोटवाडी येथील रहिवाशी होते. दीपक, त्यांचे आई वडील आणि त्यांची पत्नी असा त्यांचा परिवार आहे. तर दीपक यांचा मुलगा कच्छमध्ये त्याच्या मामाच्या घरी राहतो आणि तिथे शिकतो. दीपकने यापूर्वी दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

दीपक लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. त्यामुळे त्याचे वडील, आई आणि बायको हे तिघेही कामे करायचे. आणि दीपक मात्र शक्य त्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करायचा. दहा वर्षांपूर्वी बनावट नोटा छापल्याप्रकरणी दीपकलाही पोलिसांनी अटक केली होती. तसेच कर्ज घोटाळा आणि अनेक आर्थिक घोटाळ्यांमध्येही त्याचा हात होता. यापूर्वीही दीपकने वाशी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मच्छिमारांनी त्याला वाचवले त्यामुळे हा प्रयत्न फसला. मात्र शेवटी दीपकने सोमवारी कुटुंबाचा विचार न करता आपले जीवन संपवले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.