Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा
Saam TV July 04, 2025 03:45 AM

दोन समाजात तेढ निर्माण व्हावी, यासाठी लक्ष्मण हाके स्टंटबाजी करत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही,अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलीय. पुढील आठ दिवसात लक्ष्मण हाकेची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. लक्ष्मण हाकेंची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू असा इशाराही त्यांनी दिलाय.

लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर चुकीच्या शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा समाचार सुरज चव्हाण यांनी घेतलाय. लक्ष्मण हाकेला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारादेखील सुरज चव्हाण यांनी दिलाय. लक्ष्मण हाके जाणीपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. अजित पवार यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाहीये.

लक्ष्मण हाकेंना योग्य जागा दाखवण्याची आमची जबाबदारी आहे. लक्ष्मण हाकेंना माझं खुलं आव्हान आहे की, पुढच्या १० दिवसात त्यांनी महाराष्ट्रात खुलं फिरुन दाखवावं असे सुरज चव्हाण म्हणालेत. प्रसिद्धीसाठी बोलणाऱ्या भटक्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. भटक्या कुत्र्याचा कसा उपचार करायचा याची माहिती आम्हाला आहे, असेही सुरज चव्हाण म्हणाले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांनी वापरलेले शब्द कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यांच्या या कृतीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हाकेंच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाकडून हाके थेट इशारा देण्यात आलाय.

दरम्यान लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि सारथी संस्थेला पैसे दिले जातात. पण महाज्योती संस्थेला पैसे दिले जात नाहीत. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीये, असा आरोप हाकेंनी केलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.