पंचांग -
शुक्रवार : आषाढ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.४७, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय दुपारी १.४६, चंद्रास्त उ. रात्री १.११, भारतीय सौर आषाढ १३ शके १९४७.
दिनविशेष -
१९९९ - कारगिलमधील द्रास या उपविभागातील ‘टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू भारतीय लष्कराने घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
२००४ - सुमारे ७०० किलोमीटरपर्यंत जमिनीवर मारा करण्याची क्षमता बाळगणाऱ्या ‘अग्नी-१’ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर बेटावर चाचणी.
२०१५ - ग्वांगझी येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या इंदरजितसिंगने गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.