IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम
esakal July 04, 2025 03:45 AM

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारताच्या फलंदाजाने एडबस्टन कसोटीत वर्चस्व गाजवताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवस्था वाईट केली. यशस्वी जैस्वालने सलामीला येऊन ८७ धावांची खेळी करताना भारताला दणदणीत सुरुवात करून दिली. करुण नायर ( ३१) आणि रिषभ पंत ( २५) यांना मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी व शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी मजबूत भागीदारी करताना संघाला अडीचशे पार पोहोचवले. यशस्वीचे शतक हुकले असले तरी शुभमनने मोर्चा सांभाळला आणि द्विशतक झळकावून अनेक विक्रम मोडले.

पहिल्या दिवशी त्याने शतक पूर्ण करून अनेक विक्रम मोडले. दुसऱ्या दिवशी त्याने शतकाने दीडशतकात रुपांतर करताना कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाची साथ मिळाली आणि सहाव्या विकेटसाठी दोघांनी द्विशतकी भागीदारी करून संघाला चारशेपार पोहोचवले. २००२ नंतर इंग्लंडमध्ये दीडशे धावा करणारा गिल पहिलाच भारतीय ठरला. राहुल द्रविडने २००२ मध्ये ओव्हल कसोटीत २१७ धावा केल्या होत्या.

Vaibhav Suryavanshi सह भारताच्या युवा संघाने केला १०० किलोमीटर प्रवास; काल मॅच जिंकली अन्... कारण वाचून वाटेल आश्चर्य कसोटीत १४०+ पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू भारतीय कर्णधार
  • विजय हजारे ( २) - इंग्लंडचा भारत दौरा, १९५१

  • सुनील गावस्कर ( २) - वेस्ट इंडिजचा भारत दौरा, १९७८

  • विराट कोहली ( २) - भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४

  • विराट कोहली ( २) - इंग्लंडचा भारत दौरा, २०१६

  • विराट कोहली ( २) - भारताचा श्रीलंका दौरा, २०१७

  • शुभमन गिल ( २) - भारताचा इंग्लंड दौरा, २०२५

इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वोत्तम धावसंख्या असलेले भारतीय कर्णधार
  • १७९ धावा - मोहम्मद अझरुद्दीन, मँचेस्टर, १९९०

  • १६५ धावा - शुभमन गिल, बर्मिंगहॅम, २०२५

  • १४९ धावा - विराट कोहली, बर्मिंगहॅम, २०१८

  • १४८ धावा - मन्सूर अली खान पतौडी, लीड्स, १९६७

  • १४७ धावा - शुभमन गिल, लीड्स, २०२५

शुभमन गिल व रवींद्र जडेजा यांची भागीदारी २०३ धावांवर तुटली. इंग्लंडमधील ही सहा किंवा त्याखालील विकेटसाठी झालेली तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०२२ मध्ये रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी बर्मिंगहॅम कसोटीत २२२ धावा, तर २०१८ मध्ये दी ओव्हलवर लोकेश राहुल व रिषभ यांनी २०४ धावा जोडल्या होत्या. जॉश टंगने इंग्लंडला विकेट मिळवून दिली. जडेजा १३७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८९ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने २५ षटकांत १०९ धावा चोपल्या आणि जड्डूच्या रुपाने एक विकेट गमावली.

Highest Test scores by India captains in England

लंच ब्रेकनंतर गिलने १८० धावांपर्यंत मजल मारून आणखी एक मोठा विक्रम केला. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधाराचा मान त्याने पटकावला. त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा ( १७९ धावा, ओल्ड ट्रॅफर्ड, १९९०) विक्रम मोडला. यासह कसोटी कर्णधार म्हणून २५ व्या वर्षी परदेशात सर्वाधिक ३२३ धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरचा १९९७ सालचा श्रीलंकेतील २९० धावांचा विक्रम मोडला.

  • २९० - सचिन तेंडुलकर वि. श्रीलंका, १९९७

  • २८९ - सचिन तेंडुलकर वि. वेस्ट इंडिज, १९९७

  • २५४ - कपिल देव वि. वेस्ट इंडिज, १९८३

  • २४१ - सचिन तेंडुलकर वि. झिम्बाब्वेस १९९६

  • ११४ - मन्सुर अली खान पतौडी वि. वेस्ट इंडिज, १९६२

शुभमन गिलने ३११ चेंडूंत द्विशतक पूर्ण केले आणि इंग्लंडमध्ये द्विशतक ७६ करणारा गिल हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. वॉशिंग्टन सुंदरने दमदार फटकेबाजी करताना गिलसह ५६ धावांची भागीदारी ७६ चेंडूंत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.