Neet pg परीक्षेची तारीख पुढे ढकलली
Marathi June 03, 2025 03:26 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी ‘नीट पीजी’ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार 15 जून 2025 रोजी परीक्षा होणार होती. मात्र, अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचा आदेश दिल्यानंतर तारखेत बदल करावा लागत आहे. सुधारित तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आली नसून ती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे परीक्षा मंडळाने सोमवारी स्पष्ट केले. नीट पीजी 2025 ही परीक्षा देण्यासाठी यंदा 2 लाख 42 हजार 678 परीक्षार्थींनी आवेदनपत्रे सादर केली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ती एकाचवेळी घ्यायची असेल, तर अधिक केंद्रे शोधावी लागणार आहेत. पुरेशा प्रमाणात केंद्रे उपलब्ध करण्यासाठी परीक्षा घेण्यास विलंब होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.