Vastu Tips : या कारणांमुळे घरात पैसा टिकत नाही
Marathi June 03, 2025 05:27 PM

खूप मेहनत केली, कितीही पैसा कमावला तरी सामान्य माणसाला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू होताच अनेकांचा खिसा रिकामा होतो. काही जणांची तर अशी तक्रार असते की, कितीही बचत करण्याचा प्रयत्न केला तरी पैसा काही घरात टिकायचं नाव घेत नाही. पण, घरात पैसा टिकत नाही, याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या काही कारणांमुळे आर्थिक समस्या सुरू होतात, ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही. आज आपण अशी काही सामान्य कारणे पाहणार आहोत ज्यामुळे घरात पैसा टिकण्यास अडचणी येतात.

बाथरूममध्ये ओले कपडे –

अनेकांना अंघोळ केल्यावर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच ठेवण्याची सवय असते. पण, तुमच्या या सवयीमुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रुसू शकते. देवी लक्ष्मी रूसल्यावर घरात आर्थिक अडचणी सुरू होतात आणि हातात पैसा टिकत नाही.

सतत वाद –

जर तुमच्या घरात सतत कलह, वाद होत असेल तर देवी लक्ष्मी कोपू शकते. ज्यामुळे घरात पैसा न टिकण्याची समस्या उद्भवते.

पाण्याचा प्रवाह –

जर तुमच्या घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह चुकीच्या दिशेने असेल तर पैशांसंबंधित समस्या सुरू होतात.

तिजोरीची चुकीची दिशा –

घरातील तिजोरी चुकीच्या दिशेने असेल तर संपत्तीवर परिणाम होऊ शकतो, आर्थिक अडचणी सुरू होतात. त्यामुळे तिजोरीची दिशा वास्तुशास्त्रानुसार ठेवावी.

ताटात हात धुणे –

जेवणानंतर ताटात हात धुण्याची सवय आर्थिक अडचणींना आमंत्रण देणारी आहे. त्यामुळे तुम्हाला अशी काही सवय असेल तर त्वरीत सोडावी.

बंद पडलेली घड्याळ –

जर घरात बंद पडलेली घड्याळ असतील तर आर्थिक समस्या सुरू होतात. त्यामुळे असे वाटत असेल की, घरात पैसा टिकावा तर त्वरीत बंद घड्याळ घराबाहेर काढा.

गळका नळ –

घरात पैसा टिकावा, लक्ष्मी देवीचा आर्शिवाद तुमच्यावर सदैव राहावा अशी इच्छा असल्यास घरातील गळके नळ आधी दुरूस्त करून घ्यावेत. कारण गळके नळ आर्थिक अडचणी सुरू करतात.

त्यामुळे तुम्हालाही यांपैकी काही सवयी असतील तर त्या त्वरीत बंद करा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=wfvusvbofws

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.