सुषमा अंधारेंनी आता जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याचंही नाव घेतलं, PI शशिकांत चव्हाणांकडे थार गाड
Marathi June 03, 2025 06:28 PM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये फक्त हगवणे परिवारच नाही तर त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार देखील त्यांना साथ देत असल्याचं समोर आलं. वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाण हा घरातील वादात किंवा इतर गोष्टींमध्ये असायचा तर, बाहेरच्यांना धमकावण्यासाठी हगवणे परिवार त्यांचा मामा जालिंदप सुपेकर यांच्या नावाचा वापर करायचा आणि धमक्या द्यायचा असं समोर आलं आहे, त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना मदत करणारा, थार गाडी दिमतीला देणारे चोंधे बंधु यांच्याशी संबंधित मोठी माहिती आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप

सुषमा अंधारे यांच्यासह मविआच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी सांगितलं की, या भेटीमध्ये चाकणकर हा व्यक्तीगत पातळीवरचा विषय नव्हता, त्याचबरोबर इतका छोटा विषय घेऊन राज्यापालांना भेटण्याचं काहीही कारण नाही. जे मुद्दे आम्ही आज या चर्चेवेळी मांडलेले होते. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पहिला मुद्दा वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप आहे. हगवणे केसमधील ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो, आणि त्यांचं पदावनती झाली, त्या जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस स्टेशनला पीआय आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंधेच्या थार गाडी घेऊन गेले  होते, त्या चोंधेंच्या दोन सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांच्या अरबो रूपयांच्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स सुरू आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांची चौकशी करण्यात यावी, याबाबतची चर्चा आम्ही राज्यपालांसोबत केली, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हणा शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे. 

राजेंद्र ह्यूलल डेब्री फॅमिलीच्या घोडा कुटुंबाचा बाऊर & बीएसपी; "मजकूर-संरेखित: न्याय्य;">सुयश चोंधेच्या पत्नीने धनश्री चोंधे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, नवरा सुयश चोंधे याच्यासह घरातील सर्वांनी छळ केला. त्यांनी पैशांसाठी मानसिक, शारिरीक छळ केला आहे. माहेरून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देत होते. मुलगी झाली म्हणून देखील त्यांनी त्रास दिला होता.  मुलगी झाली तेव्हापासून सासरच्यांनी काहीही तिचं पाहिलं नाही. माझ्या माहेरून तीचं शिक्षण आणि बाकी खर्च केला जातोय. सुयश चोंधेच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीनंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. राजेंद्र हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्री संबंध आहेत. मी नोव्हेंबरपासून माझ्या माहेरी आहे. त्यामुळे मला तिकडची आत्ताची जास्त माहिती नाही. पण, हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीसंबंध आहेत, अशी माहिती सुयश चोंधेच्या पत्नीने दिले आहेत.

<डिव्ह आयडी ="संबंधित सर्च 1"> & nbsp;

& nbsp;

& nbsp;

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.