लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट
Marathi June 03, 2025 09:28 PM

मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात असल्याचं देखील म्हटलं. लाडक्या बहिणींना ज्या प्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यात आला होता त्याप्रमाणेच मे महिन्याचा हप्ता दिला जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात वितरित केला जाईल. लाडक्या बहिणींना आश्वस्त करायचं आहे की जसा एप्रिल महिन्याचा थेट खात्यात जमा झाला होता तसाच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

त्या महिलांना पैसे देणं जानेवारीपासून बंद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलं होतं. त्याबाबत विचारल असता आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. तीन चार महिन्यापूर्वी आम्ही बारकाईन स्क्रूटिनी करण्यात आली. त्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेतायत. शासकीय कर्मचाऱ्यांचा 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा मिळाला होता. त्यातील 2 ते अडीच हजार कर्मचारी लाभ घेत होते. जेव्हा ते लक्षात आलं होतं तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.  लाडकी बहीण योजना महायुती सरकारं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना 10 महिन्यांची रक्कम देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मेच्या दरम्यान देण्यात आलाहोता.

महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणं महत्त्वाचं

आदिती तटकरे यांनी यावेळी ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याचं समोर आलं होतं, त्याविषयी देखील सरकारनं काय कार्यवाही केली याची माहिती दिली. जिल्हाधिका-यांना ऊस तोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

महिला आयोगासंदर्भातील बैठकिला काहींना निमंत्रित करता आले नाही.बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या तर त्या अंमलात आणू, असंही आदिती तटकरे म्हणाल्या. महायुतीतून कुणी वैयक्तिक टीका केलेली नाही. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे.सूचनांचा विचार नक्की करू, असंही आदिती तटकरेंनी म्हटलं.

https://www.youtube.com/watch?v=iqhd4czaqze

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.