Setback for Sharad Pawar in Hingoli, Senior Leader to Join Ajit Pawar’s Faction
Marathi June 03, 2025 10:37 PM


लोकसभेत महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी मोठा विजय मिळवला. त्याउलट भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

हिंगोली : लोकसभेत महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी मोठा विजय मिळवला. त्याउलट भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, अनेक नेते महाविकास आघाडीकडून दूर जाताना दिसत आहेत. अशाच एका मोठ्या घडामोडीमध्ये, हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेते ज्येष्ठ अनिल पतंगे जे खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात यांनी आता शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शरद पवार गटाला आता हिंगोली जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (NCP vs NCP: Setback for Sharad Pawar in Hingoli, Senior Leader to Join Ajit Pawar’s Faction)

या संदर्भात अनिल पतंगे म्हणाले, “८ जून रोजी सेनगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत. कार्यक्रमाची तयारी सुरू असून, आमचे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत.

या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, तसेच राष्ट्रवादीचे इतर काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. अनिल पतंगे म्हणाले, “आमदार राजू नवघरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.” ते पुढे म्हणाले, “शरद पवार यांच्याविषयी आमच्यात कोणताही राग नाही. आम्ही त्यांचे निष्ठावंत राहिलो आहोत. मात्र, मागील दहा वर्षांपासून आम्ही सातत्याने विरोधात होतो, त्यामुळे विकासकामांना अडथळा येत होता. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अनिल पतंगे यांनी दिली आहे.

अजित पवार ८ जून रोजी हिंगोली दौऱ्यावर, सेनगावमध्ये होणार पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार ८ जून रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, सेनगाव येथे त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, नगरसेवक आणि ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.या राजकीय बदलामुळे हिंगोलीमधील आगामी निवडणुकांमध्ये मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वचा…MNS : राज ठाकरेंना कोकणात धक्का बसण्याची शक्यता, सरचिटणीस खेडेकर यांच्या पोस्टने खळबळ



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.