सोन्याच्या भावात पुन्हा दरवाढ, मुंबईत 1 लाख पार; लगीनसराईत उतरलेले दागिन्यांचे भाव वधारले
Marathi June 05, 2025 05:25 PM

मुंबई : सोन्याच्या दरात हळू हळू पण गेल्या दोन महिन्यांपूर्वी मोठी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, सोन्याचा (Gold) दर प्रति तोळा 1 लाख रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर, सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसून येत आहे. कधी कमी, कधी जास्त असं करत सोने दरात पुन्हा भाववाढ झाली असून सोनं पुन्हा लाख मोलाचं बनलं आहे. सोन्याच्या किंमतींनी आज पुन्हा 1 लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. मुंबबी) सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 1 लाख 200 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटी (जीएसटी) बिलासह सोन्याचा दर लाखांच्या पार गेला आहे. गत महिन्यात लगीनसराई असल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी दिसून आली. त्यावेळी, काही प्रमाणात सोन्याच्या दरात कपात झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता.

22 एप्रिल रोजी 1 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर, सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अशा परिस्थितीत, आज म्हणजेच 2 जून रोजीपर्यंत सोन्याच्या दरात घसरण दिसन येत होती. 22 कॅरेट सोनं 89,190 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. तर 24 कॅरेट सोने 97,300 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात होते. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून जीएसटी बिलासह सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 200 रुपयांवर पोहोचला आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे 1 ग्रॅम सोन्यासाठी 10 हजार 22 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे, 1 तोळा सोन्यासाठी 1 लाख 22 हजार रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतल्याने सोनं पुन्हा एकदा लाख मोलाचं झालं आहे.

किंमत कशी ठरवली जाते?

सोन्याची किंमत केवळ मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरवली जात नाही. याउलट, यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत, जसे की जागतिक बाजार, लंडनचा ओटीसी स्पॉट मार्केट आणि कॉमेक्स गोल्ड फ्युचर्स मार्केट. याशिवाय, डॉलरमधील चढउतार, भू-राजकीय तणाव यासह अनेक घटक त्यावर परिणाम करतात. भारतात सोन्याचे विशेष स्थान आहे, कोणत्याही लग्नात किंवा उत्सवात ते असणे शुभ मानले जाते. याशिवाय, कुटुंबात सोन्याच्या दागिन्यांची उपस्थिती देखील त्यांच्या समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

हेही वाचा

लिव्ह इन हत्याकांडाचा थरारक शेवट, आधी मैत्रिणीच्या बरगड्यात चाकू, आता पसार आरोपी शेतात लटकलेल्या अवस्थेत, कोल्हापूर हादरलं

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.