आरसीबी फॅन आयपीएल उत्सव: अहमदाबादमध्ये आयपीएलच्या (IPL 2025) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावे केली. पण हा जल्लोष केवळ स्टेडियमपुरता मर्यादित राहिला नाही… पुण्यापासून ते बंगळुरूपर्यंतच्या रस्त्यांवर RCB चाहत्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला.
“राडा होणार, पोरं नाही ऐकणार!” हे स्लोगन ओरडत, हातात झेंडे, टीशर्ट, आणि विराट कोहलीच्या पोस्टर्स घेऊन हजारो चाहते रस्त्यावर उतरले. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी चाहते एकत्र जमले आणि ढोल-ताशांवर नाचत RCB चं सेलीब्रेशन केले.
बंगळुरूमध्ये तर दृश्य आणखीनच भव्य होतं. MG रोड, ब्रिगेड रोड, इंदिरानगर परिसरात रात्रभर जल्लोष, गाड्यांच्या मिरवणुका आणि फटाक्यांचा आवाज यामुळे संपूर्ण शहर थरारून गेलं. ट्रॅफिक पोलिसांना रात्रभर तग धरावी लागली.
मोठ्या स्टार्सनी सजलेल्या आरसीबी संघाला गेल्या 18 वर्षांत ही संधी मिळाली नव्हती. कधी चेन्नईत तर कधी मुंबईत जल्लोष झाला. विजयाचा हा जल्लोष कोलकाता, हैदराबाद आणि जयपूरमध्येही झाला. पण कधी बंगळुरूमध्ये झाला नव्हता.. पण यंदा पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावे केली आणि चाहत्यांना एक आनंदाची संधी.
ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांचे एकत्र सेलीब्रेशन
ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली एकत्र आनंद साजरा करताना पाहण्याचा अनुभव अनेक प्रकारे संस्मरणीय होता, विशेषतः ज्या पद्धतीने डिव्हिलियर्सने मैदानाच्या मध्येच आरसीबी टी-शर्ट घातला आणि ज्या प्रकारे गेलने विराटला उचलले, ते पाहून असे वाटले की 10 वर्षे एकत्र स्वप्न जगले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरताना पाहणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू आहे. पण तो विराट कोहलीचा खरा मित्रही आहे.
आणखी वाचा