पंचांग -
बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ५.४१, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दुपारी १.२२, चंद्रास्त उ. रात्री १.४०, महेश नवमी, भारतीय सौर ज्येष्ठ १४ शके १९४७.
दिनविशेष -
१९९७ - दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘इन्सॅट-२ डी’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.
२०१५ - आशियाई मैदानी स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत भारताच्या एम. आर. पूवम्माला रौप्यपदक.
२०१६ - अफगाणिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘गाझी अमानुल्ला खान पुरस्कार’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान.